बुधवार, 24 एप्रिल 2024
  1. मनोरंजन
  2. »
  3. मराठी सिनेमा
  4. »
  5. नाट्य-चित्र गप्पा
Written By वेबदुनिया|
Last Modified: लंडन , मंगळवार, 22 मार्च 2011 (12:41 IST)

आशा भोसले चित्रपटात काम करणार

ND
आशा भोसले पहिल्यांदा 'माई' नावाच्या चित्रपटात भूमिका करणार असून, या चित्रपटात आशाजी स्वतःच्या भूमिकेसाठी गाणेसुद्धा गाणार आहेत. आशा भोसले यांनी आपल्या कारकिर्दीत अनेक अभिनेत्रींसाठी गाणे गायले; मात्र आता 'माई' या चित्रपटात त्या स्वतःसाठी गाणार आहेत.

लंडनमध्ये एका कॉन्सर्टदरम्यान त्यांनी ही घोषणा केली. आशा भोसले यांनी आतापर्यंत १८ भाषांमध्ये १२ हजारपेक्षा जास्त गाणी गायली आहेत. त्यांनी अनेक विदेशी गायकांसोबतही गाणी गायली आहेत. त्यांना दोन वेळेस ग्रँमी अवॉर्डस्‌साठी नामांकन करण्यात आले आहे. लंडनमध्ये माझ्या गाण्यांबद्दलचा लोकांचा उत्साह पाहून आपल्याला आनंद झाला असल्याचे आशा भोसले यांनी म्हटले आहे.