शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. मनोरंजन
  2. »
  3. मराठी सिनेमा
  4. »
  5. नाट्य-चित्र गप्पा
Written By वेबदुनिया|
Last Modified: शनिवार, 12 मार्च 2011 (16:59 IST)

तू भेटशी नव्यानेचे १५० भाग पूर्ण

- चंद्रकांत शिंदे

WD
मी मराठी वाहिनीवर सुरु असलेल्या आणि अल्पावधीतच लोकप्रिय झालेल्या तू भेटशी नव्याने मालिकेने नुकतेच १५० भाग पूर्ण केले. १५० भाग पूर्ण झाल्याच्या निमित्ताने मुंबईत एका पार्टीचे आयोजन निर्माते जीतू अरोरा आणि आकांक्षा खन्ना यांनी केले होते. या पार्टीत मालिकेतील सर्व कलाकार आणि तंत्रज्ञ उपस्थित होते. जीतू अरोरा यांनी सांगितले, मी अनेक हिंदी चित्रपटांसाठी काम केले आहे आणि मराठीत माझा हा पहिलाच प्रयत्न आहे.

मी मुंबईत रहात असल्याने मला मराठीत काहीतरी करायचे होते. मला जेव्हा तू भेटशी नव्यानेचे कथानक सांगण्यात आले तेव्हा मला ते ख़ूपच आवडले. मी मी मराठी वाहिनीच्या अच्च्िकार्‍यांना हे कथानक सांगितले तेव्हा त्यांनाही ते आवडले
आणि त्यांनी लगेचच आम्हाला मालिका बनवण्याची परवानगी दिली. माझी सहकारी आणि मालिकेची निर्माती आकांक्षा खन्नााने अनेक अंतरराष्ट्रीय प्रोजेक्टमध्ये काम केले आहे. आम्ही दोघांनी मिळून ही मालिका सर्वांगसुंदर आणि उत्कृष्ट कशी होईल यावर लक्ष दिले. प्रेक्षकांना जे आवडते तेच देण्याचा आम्ही प्रयत्न केला म्हणूनच आम्ही यशस्वी ठरलो. अर्थात यामध्ये कलाकारांचाही सहभाग मोठा आहे.

तू भेटशी नव्यानेमध्ये ऋजुता देशमुख, आशुतोष कुलकर्णी, अशोक शिंदे, मच्छू कांबीकर, प्रदीप वेलणकर, यतीन कार्येकर, शेखर फडके आणि विक्रम गोखले यांच्या मुख्य भूमिका असून यात आता स्मिता ओक, समीर विजय, स्वप्नाली पाटील, अश्विनी एकबोटे आणि शरद पोंक्षेही दिसणार आहेत.