बुधवार, 24 एप्रिल 2024
  1. मनोरंजन
  2. »
  3. मराठी सिनेमा
  4. »
  5. नाट्य-चित्र गप्पा
Written By वेबदुनिया|

पायरेसी करा, एक लाख रुपए मिळवा

- चंद्रकांत शिंदे

मराठी चित्रपटात पूर्वीप्रमाणे चांगले संगीत ऐकू येत नाही. गेल्या एक-दोन वर्षांपासून मराठी चित्रपट निर्मिती वाढलेली असली तरी कर्णप्रिय संगीत तेवढ्या प्रमाणात तयार होताना दिसत नाही. एखादाच झेंडा, नटरंग तयार होतो ज्यातील गाणी हिट होतात. चांगली गाणी नसल्याने ध्वनीफित कंपन्या मराठी चित्रपटांची गीते बाजारात आणण्यास उत्सुक नसतात. त्यातच इंटरनेटवरून मोफत गाणी
डाउनलोड करण्याची प्रथा चांगलीच वाढीस लागल्याने तर मराठी चित्रपट संगीत जवळ-जवळ दिसेनासेच झाले आहे. अशा वेळेस प्रथमच एका मराठी निर्मात्याने आपल्या नव्या दोन चित्रपटाची ध्वनीफित विशेष तंत्रज्ञानाने तयार केली आहे ज्यामुळे त्याची पायरेसी करणे जवळ-जवळ अशक्य आहे. या निर्मात्याचे नाव आहे सचिन वर्तक आणि त्याने निर्माण केलेल्या चित्रपटांची नावे आहेत पाच
नार एक बेजार आणि प्रेमासाठी.

सचिनने वेबदुनियाशी बोलताना सांगितले की, नव्या तंत्रज्ञानाने ही ध्वनीफित तयार केली असल्याने याची पायरेसी करणे अशक्य आहे. मात्र जर कोणी आमच्या या ध्वनीफितीची पायरेसी करून आमच्याकडे घेऊन आला तर त्याला आम्ही एक लाख रुपयांचे पारितोषिक देऊ. आम्हाला पूर्ण खात्री आहे की कोणीही या ध्वनीफितीची पायरेसी करू शकणार नाही. व्यवसायाने बिल्डर असलेला सचिन दोन नवीन मराठी चित्रपट घेऊन प्रेक्षकांसमोर येत आहे. पाच नार एक बेजारबाबत माहिती देताना सचिनने सांगितले, अनेक वर्षांपासून मला चित्रपट निर्मितीत उतरावे असे वाटत होते. त्यातूनच मी फ्रेमवर्क एंटरटेनमेंट प्रा. लि. ची स्थापना केली आणि चित्रपट निर्मिती सुरू केली. पाच नार एक बेजारचे कथानक लेखक अनिल पवार आणि दिग्दर्शक विजय सातघरे यांनी ऐकवले तेव्हा मला ते खूपच आवडले आणि मी लगेच या चित्रपटाला सुरुवात केली. मला विनोदाच्या माध्यामातून प्रेक्षकांना काहीतरी संदेश देण्याचे काम करायचे आहे. पाच नारमघ्ये अशा पाच बहिणींची कथा मांडण्यात आलेली आहे ज्या मोठ्या बहिणीचा हुंडाबळी झाल्यामुळे लग्न न करण्याचे ठरवतात.

मात्र वडिलांच्या सततच्या मागणीमुळे या पाचही बहिणी एकाच तरुणाशी लग्न करण्याची विचित्र अट घालतात. वडिल मग एका तरुणाची निवड करतात आणि पुढे जी काही द्रमाल होते त्याची कथा म्हणजे हा चित्रपट, संजय नार्वेकरने खूपच चांगली भूमिका साकारली आहे. संजयबरोबर आदिती सारंगच्च्र, हेमांगी कवी, श्वेता मेहेंदळे, लीना भागवत, हर्षाली झीने या पाच तरुणी भूमिका साकारीत आहेत तर या पाच मुलींच्या पित्याची भूमिका विजय चव्हाण साकारीत आहेत. चित्रपटाला चिनार-महेश यांनी संगीत दिले असून मराठीत प्रथमच मोहित चव्हाण व नीरज श्रीच्च्र यांनी गीते गायली आहेत.

सचिनने पुढे सांगितले पाच नार एक बेजारबरोबच मी प्रेमासाठी चित्रपटाची ही निर्मिती केली आहे. हा चित्रपटही लवकरच प्रदर्शित होणार आहे. प्रेमासाठीचे दिग्दर्शन अमोल सुर्वे यांनी केले अआहे तर कथा श्रीकांत प्रभु व प्रभु कौस्तुभ यांची आहे. प्रेमासाठी हा नावाप्रमाणेच एक प्रेमपट आहे ज्यात कुलदीप पवार, विजय चव्हाण, श्रीकांत मोघे, प्रिया बेर्डे, प्राजक्ता कुलकर्णी, वरद चव्हाण यांच्या मुख्य भूमिका आहेत. दोन्ही चित्रपटातील गीते प्रेक्षकांना नक्कीच आवडतील. दोन्ही चित्रपट आम्ही एप्रिलमध्ये प्रदर्शित करणार आहोत.