शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: बुधवार, 7 ऑक्टोबर 2015 (11:33 IST)

प्रेक्षकांना सरप्राईज देणार स्पृहा जोशी

अभिनेत्री स्पृहा जोशी ‘पेईंग घोस्ट’, ‘बायोस्कोप’ या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या मराठी चित्रपटानंतर सध्या काय करत आहे याबद्दल तिच्या चाहत्यांना उत्सुकता असेलच. सध्या ‘समुद्र’ या नाटकातही स्पृहा व्यस्त आहे. पण स्पृहाबद्दलची चाहत्यांची उत्सुकता आता अचानक वाढली आहे. त्याला कारणही तसेच आहे.
 
नुकतेच एका सोशल साईटवर स्पृहाने पोस्ट टाकली ज्यात ती म्हणते - after a small pause, from agnihotra to eka lagnachi tisari goshta, the journey is ready to take a brave step into a new direction...October. My birthday month.. coming with many new surprises.. announcements...stay tuned  या पोस्टनंतर स्पृहाच्या चाहत्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. नेहमीच काही तरी नवनवीन घेऊन स्पृहा येत असते आणि नेहमीच तिच्या चाहत्यांना नव-नवे सरप्राईज देत असते. आता हेच बघा ना आधी फक्त एक अभिनेत्री असणारी स्पृहा कविताही लिहिते हे ‘लोपामुद्रा’ या तिच्या काव्यसंग्रहामुळे कळले. ‘बावरे प्रेम हे’, ‘डबल सीट’ सारख्या चित्रपटांमुळे ती गीते लिहू शकते हे कळले. ती निवेदिका आहेच शिवाय ‘समुद्र’, ‘नांदी’सारख्या नाटकातून तिचा नाटय़ाभिनय लोकांपर्यंत पोहचतो आहे. इतक्या विविधांगी कलांनी समृद्ध असणारी ही अभिनेत्री आता नवीन काय करणार याबद्दल सर्वानाच उत्सुकता आहे, यातच हा महिना म्हणजे स्पृहाचा बर्थ डे मन्थ आहे. 13 ऑक्टोबरला तिचा वाढदिवस असतो. तोपर्यंत तरी आपल्याला फक्त अंदाजच लावता येईल की स्पृहा नक्की चाहत्यांना काय सरप्राईज देणार ते आणि जे सरप्राईज असेल ते आम्ही तुम्हाला कळवूच.