गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: शुक्रवार, 4 सप्टेंबर 2015 (17:13 IST)

प्रेस नोट : दगडी चाळ

१९९६ ची मुंबई …मुंबईतील तेव्हाची परिस्थिती आज रुपेरी पडद्यावर पाहणं मनोरंजनाचा एक भाग झालीयं… पण त्याकाळी प्रत्यक्ष अनुभवनाऱ्यांच्या मनात एक विदारक घर करून बसली आहे. त्यात आजही वारंवार चर्चेत येणाऱ्या नावांपैकीच एक नाव म्हणजे दगडी चाळ अर्थात डॅडी …. 
 
त्याकाळात मुंबईवर आपली सत्ता प्रस्थापित करू पाहणाऱ्या काही नावांमधल एक नाव म्हणजे डॅडी आणि त्यांचं सुरक्षा कवच असलेली दगडी चाळ सर्वश्रुत आहे, कारण गॅंग्ज आणि गॅंगवॉर्सच्या सर्कल मध्ये अडकलेली आमची मुंबई…. 
 
अर्थात हा वाम मार्ग तेव्हा काही सगळ्यांनी च स्वेछेने निवडला नव्हता. अशाच प्रतिकूल परिस्थितीत अपघाताने या प्रवाहात अडकलेल्या एका सामान्य तरुणाच्या आयुष्यावर चित्रित झालेला दगडी चाळ हा रंजक मराठी सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाला आहे. 
 
मराठी सिनेसृष्टीच्या कारकिर्दीत दगडी चाळ अशा व्यक्तिरेखांवर आधारलेला हा पहिला वाहिला मराठी सिनेमा प्रेक्षकांसाठी नक्कीच उत्कंठावर्धक असेल यात शंकाच नाही… या चित्रपटाच केंद्रबिंदू  गॅंगवॉर नसून त्यातील हळुवार फुलत जाणारी प्रेमकथा आहे. त्यामुळे यंगस्टर्ससाठी एक पर्वणीच असेल…
 
 मंगलमूर्ती फिल्म्स आणि साई पूजा फिल्म्स यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे…. दिग्दर्शक चंद्रकांत कणसे यांनीही या सिनेमाच्या निमित्ताने दिग्दर्शनात पदार्पण केलंय…हा सिनेमा २ ऑंक्टोबर २०१५ रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होतोय…. एकूणच मराठीतील हा पहिला वाहिला स्टाईलिश दगडी चाळ प्रेक्षकांच्या मनात नक्कीच घर करेल …