शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: शुक्रवार, 22 जानेवारी 2016 (10:03 IST)

‘नटसम्राट’ पुन्हा प्रदर्शित

रसिकांचा जबरदस्त प्रतिसाद मिळवत असलेला अभिनेता नाना पाटेकर आणि विक्रम गोखले यांच्या अभिनयाने सजलेला ‘नटसम्राट’ पुन:प्रदर्शित करण्यात येत आहे. चित्रपटात एक नवा सात मिनिटांच्या सीनचा समावेश करण्यात आला आहे.
 
नाना आणि विक्रम गोखले यांच्यातील संवाद असलेला सात मिनिटांचा सीन नव्या सिनेमात समाविष्ट करण्यात आला आहे. मध्यांतरानंतर हा नवा संवाद पाहायला मिळणार आहे. वेळेअभावी या सीनला कात्री लावण्यात आली होती. मात्र प्रेक्षकांचा प्रतिसाद पाहता, तो सीन पुन्हा समाविष्ट करण्याचा निर्णय ‘नटसम्राट’ टीमने घेतला आहे. 
 
एखाद्या लोकप्रिय चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर नवीन दृश्य समाविष्ट करण्याचा मराठीतला हा बहुदा पहिलाच प्रकार आहे. पहिल्या दिवसापासूनच या चित्रपटाने जोरदार कमाईचा गल्ला जमवण्यास सुरूवात केली होती.