शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified: शुक्रवार, 24 एप्रिल 2015 (13:15 IST)

झिवाच्या हास्यामुळे माझे आयुष्य बदलले: धोनी

मिस्टर कूल अशी ओळख असलेला भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी याने मुलगी झिवा हिच्या स्मितहास्याने आपले आयुष्यच बदलले असल्याचे म्हटले आहे. टी-20 लीग खेळत असताना, धोनी आपली पत्नी साक्षी व मुलगी झिवाला बरोबर घेऊनच विविध शहरांमध्ये सामने खेळत आहे.

धोनीने ट्विटरवर आपल्या मुलीला प्रथमच ड्रेसिंग रूममध्ये नेल्याचे छायाचित्र प्रसिद्ध केले. मी भारतासाठी व चेन्नईसाठी खेळत आहे याचे तिला काही देणेघेणे नाही. तिला रडू वाटले की ती रडते.