मंगळवार, 16 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. क्रिकेट मराठी
  4. »
  5. क्रिकेट वृत्त
Written By वेबदुनिया|

सचिनने मालिकेनंतर निवृत्त व्हावे: विनोद कांबळी

FILE
सचिन तेंडुलकरने इंग्लडविरूद्धच्या मालिकेनंतर निवृत्त होण्याचा सल्ला विनोद कांबळीने दिला आहे.

सचिन गेल्या वर्षभर्‍यापासून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सातत्याने अपयशी ठरत असून त्याच्या लौकिकास साजेसा खेळ तो करु शकत नसल्याचे चाहत्यांच्या पदरीही निराशा पडत आहे.

सचिनसारख्या सिंहाने जंगलात दहशत निर्माण करण्यापेक्षा शेळीसारखे वावरताना बघण्याची सवय क्रिकेट चाहत्यांना नाही. म्हणूनच सचिनने महान फलंदाज म्हणून प्रतिष्ठा कायम ठेवावी, ही रास्तच अपेक्षा आहे.