गुरूवार, 18 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. क्रिकेट मराठी
  4. »
  5. क्रिकेट वृत्त
Written By वेबदुनिया|

'भारता'ने चेन्नई कसोटी सामना जिंकला

मालिकेत १-० ने आघाडी

WD
येथे सुरू असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियावर ८ गडी राखून विजय मिळवत चार सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी मिळवली आहे. ऑस्ट्रेलियाच्या ५० धावांच्या माफक आव्हानाचा पाठलाग करतानाही भारताने २ गडी गमावले, पण सचिन तेंडुलकर (१३) आणि पुजारा (८)ने भारताला विजय मिळवून दिला. ऑस्ट्रेलियातर्फे पॅटिसन व लियोनने प्रत्येकी १ बळी टिपला.

दरम्यान पाचव्या दिवसाच्या सुरूवातीला भारताने ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव २४१ धावांत गुंडाळला. पहिल्या डावांत भेदक गोलंदाजी करत ७ गडी टिपणा-या आर. अश्विनने दुस-या डावातही ५ बळी घेतले. तर जडेजाने ३ आणि हरभजनने २ बळी टिपले.