शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified: शुक्रवार, 30 ऑक्टोबर 2015 (09:59 IST)

2018 चा आशिया चषक भारतात

नवी दिल्ली- 2016 ची आशिया चषक स्पर्धा बांगलादेशात तर 2018 ची आशिया चषक क्रिकेट स्पर्धा भारतात खेळली जाणार असल्याची माहिती भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे सचिव अनुराग ठाकुर यांनी दिली.
 
सिंगापूर येथील सभेत सहभागी होऊन येथे परतल्यानंतर माहिती देताना ठाकुर म्हणाले की, 2018 ची आशिया चषक स्पर्धा 50 षटकांची खेळली जावी, अशा आशयाच्या आम्ही मांडलेल्या प्रस्तावालाही मंजुरी देण्यात आली. पुढील टी-20 विश्वचषक स्पर्धा भारतात होणार असल्यामुळे ही आशिया चषक स्पर्धा त्या स्पर्धेच्या तयारीच्या दृष्टीने आशियातील संघांसाठी महत्त्वाची ठरेल, असेही ठाकुर म्हणाले.
 
पाकिस्तानात आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणे शक्य नाही आणि श्रीलंकेत पावसाळी वातावरण यामुळे अखेर बांगलादेशच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले, अशी माहिती ठाकुर यांनी दिली.