शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. क्रिकेट मराठी
  4. »
  5. क्रिकेट वृत्त
Written By वेबदुनिया|
Last Modified: मंगळवार, 20 मार्च 2012 (16:53 IST)

आशिया चषक : भारतापुढील संकट वाढले

WD
नाणेफेक - बांगलादेशाने नाणेफेक जिंकली आणि प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.

आजचा शेवटचा साखळी सामना भारताच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा आहे. या सामन्याच्या निकालावर भारतीय संघ अंतिम फेरीत पोहोचणार की नाही हे ठरणार आहे. त्यामुळेच या सामन्याला अनन्यसाधारण महत्व प्राप्त झाले आहे. आजच्या सामन्यात बांगलादेश जिंकला तर ते पाकिस्तानबरोबर अंतिम फेरीत खेळतील आणि जर त्यांचा पराभव झाला तर टीम इंडिया अंतिम फेरीत पोहोचू शकेल. त्यामुळे भारतीय संघाने श्रीलंकेच्या विजयाचे साकडे घातले आहे. आज लंके विरुद्ध बांगलादेश विजयी झाला तर टीम इंडिया आणि बांगलादेश यांचे समान ८ गुण होतील. साखळी सामन्यात बांगलादेशाने टीम इंडियाला पराभवाची धुळ चारल्याने त्यांना अंतिम फेरीत खेळण्याची संधी मिळणार आहे.

बांगलादेश - तमीम इकबाल, नजीमुद्दीन, जहुरुल इस्लाम, मुश्फिकर रहीम (कर्णधार), शाकिब अल हसन, माहमदुल्लाह, नासिर हुसैन, मशरफे मोर्तजा, अब्दुर रज्जाक, शाहदत हुसैन आणि जमुल हुसैन.



श्रीलंका - तिलकरत्ने दिलशान, महेला जयवर्धने, कुमार संगकारा, उपुल थरंगा, लाहिरु थिरिमने, नुवान कुलशेखरा, फरवीज माहरूफ, लासिथ मलिंगा, सुरंगा लकमल, चमारा कपुगेदरा आणि सचित्रा सेनानायके.