शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. क्रिकेट मराठी
  4. »
  5. क्रिकेट वृत्त
Written By वेबदुनिया|

ऑस्ट्रेलिया सचिनचा सन्मान करते: वेबर

PTI
सचिन तेंडुलकरला 'ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलिया'ने सन्मानित करण्याच्या निर्णयावर तेथे नाराजीचे सूर उमटले असल्याच्या पार्श्वभूमीवर ऑस्ट्रेलियाचा फॉर्म्यूला वन ड्रायव्हर मार्क वेबर याने आपला देश सचिनचा सन्मान करत असल्याचे स्पष्ट केले.

रेड बुलचा ड्रायव्हर वेबर याने सांगितले की सचिनची कामगिरी अविश्वसनीय असून तो जगातिक सर्वोत्तम खेळाडूंपैकी एक आहे. ऑस्ट्रेलिया त्याचा मनातून सन्मान करते.

सरकार, नागरिक सर्वचजण सचिनचा सन्मान करतात. ऑस्ट्रेलियन पंतप्रधान जूलिया गिलार्ड यांनी भारत दौर्‍यावर तेंडुलकरला 'ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलिया' पुरस्काराने सन्मानित करण्याची घोषणा केली होती. देशाबाहेरील लोकांना हा पुरस्कार ‍कधीकधीच दिल्या जातो.

राज्यसभेचा सदस्य असलेला सचिन माजी अऑर्नी जनरल सोली सोरबजी यांच्यानंतर या पुरस्काराने सन्मानित होणारा दुसरा भारतीय व पहिला खेळाडू आहे.