शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. क्रिकेट मराठी
  4. »
  5. क्रिकेट वृत्त
Written By वेबदुनिया|

ऑस्ट्रेलियास पराभवाच्या खिंडीतून कोण वाचवणार?

PTI
भारताविरूद्धच्या कसोटी मालिकेत सलग तीन मानहानिकारक पराभवानंतर निराशेचे गर्तेत रूतलेल्या ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघ कर्णधार मायकेल क्लार्क व वेगवान गोलंदाज मिशेल स्टार्कच्या दुखापतीने चांगलाच कोंडीत सापडला असून कोंडी फोडणारा एकही योद्धा सरसावताना दिसत नाहीये.

संघ संकटात सापडला असताना सेनापती कोंडी फोडण्यासाठी संघर्षरत होता मात्र त्यालाच शस्त्र खाली ठेवण्याची वेळ आल्याने पराभवाने खचलेला कांगारू संघ सैरभैर झाला आहे. क्लार्कला पाठदुखीने त्रस्त केले असून चौथ्या व शेवटच्या दिल्ली कसोटीत त्याचे खेळणे अनिश्चित मानले जात आहे. या पार्श्वभूमीवर उपकर्णधार शेन वाटसन याच्याकडे नेतृत्वाची धुरा सोपवण्याची शक्यता आहे.

ऑस्ट्रेलियन संघात कर्णधार मायकेल क्लार्क वगळता कोणत्याही परिस्थितीत धावा करणारा एकही ख्यात फलंदाज नाही. कोंडीत सापडलेल्या या कांगारू संघास संकटात रसद मिळणे दूरच उपलब्ध सैनिकांनाही मैदान सोडावे लागत आहे. ऑस्ट्रेलियन संघ खिंडीत अडकला असून यातून सुटकेसाठी एखाद्यास बाजीप्रभुंसारखा पराक्रम गाजवावा लागेल, मात्र असा योद्धा त्यांच्याकडे आहे काय, हा खरा प्रश्न आहे?