बुधवार, 24 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. क्रिकेट मराठी
  4. »
  5. क्रिकेट वृत्त
Written By वेबदुनिया|
Last Modified: चेन्नई , रविवार, 27 मे 2012 (18:39 IST)

कोलकाता आणि चेन्नईत करंडकासाठी लढत

आयपीएल करंडकासाठी चेन्नई सुपर किंग्ज आणि कोलकाता नाइट रायडर्स हे आज फायनलमध्ये भिडेल. दोन्ही संघ तुल्यबळ असून त्यांना चांगले धोरणी व चतुर कर्णधार लाभले आहेत.

PR
PR
कोलकाता पहिल्यांदाज फायनलमध्ये पोहतली असून चेन्नई सलग तिसर्‍यांदा फायनलमध्ये पोहचली आहे. चेन्नईने आज करंडक जिंकल्यास त्यांची विजयची हॅट्ट्रिक साधल्या जाईल.

चेन्नईस मोठ्या सामन्यांमध्ये खेळण्याचा दांडगा अनुभव आणि सर्वच खेळाडू चांगल्या फॉर्म मध्ये असल्याने त्यांचे पारडे जड भासत आहे. कोलकात्याकडे सामना पलटवणारा सुनील नरीन सारखा हुकमी एक्का आहे. फलंदाजी आणि गोलंदाजीत त्यांनी सातत्याने चांगली कामगिरी केली आहे.

ही लढत रंगणार ती चेन्नईची फलंदाजी आणि कोलकात्याची गोलंदाजी यांच्यात. गंभीर चांगल्या फॉर्म मध्ये असून कर्णधाराच्या जबाबदारीने त्याला चांगले फलंदाज बनवले आहे.

कोलकात्याकडे गंभीर, युसूफ पठाण, मॅकुल्लम, कॅलिस, बालाजी, नरीन यांच्यासारखे उमदे खेळाडू आहेत. तर चेन्नईकडे धोनी, मुरली विजय, रैना, हिलफेनहास, आश्विन, मॉर्केल यांच्यासारखे हुकमी एक्के आहेत.

चेन्नईत होणारा हा फायनलचा मुकाबला रंगतदार होणार यात शंका नसून प्रेक्षकही हा उत्कंठावर्धक सामना एन्जॉय करतील. आजच्या सामन्यात दोन्ही संघांचा कस लागणार असून मैदानावर वरचढ ठरणारा संघ यंदाच्या आयपीएलचा विजेता ठरेल.