शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. क्रिकेट मराठी
  4. »
  5. क्रिकेट वृत्त
Written By wd|
Last Modified: कोलकाता , गुरूवार, 29 मे 2014 (13:19 IST)

कोलकाता संघ अंतिम फेरीत दाखल

सलामीचा फलंदाज रॉबीन उथप्पाच 42 धावा, उमेश यादवचे 13 धावात 3 बळी याच्या जोरावर कोलकाता नाइट राडर्सने सातव्या आयपीएल टी-20 स्पर्धेची अंतिम फेी गाठली.

कोलकाता संघाने साखळी तक्त्यात अग्रस्थानी असलेल्या किंग्ज इलेव्हन पंजाब संघाचा 28 धावांनी पराभव केला. कोलकाता संघ हा 1 जून रोजी होणार्‍या बंगळुरू येथील अंतिम सामन्यात खेळेल. पराभूत झालेला पंजाबचा संघ 30 मे रोजी खेळल्या जाणार्‍या दुसर्‍या क्वॉलिफायर सामन्यात चेन्नई या संघाशी खेळेल.

नाणेफेक जिंकून पंजाबचा कर्णधार जॉर्ज बेली याने प्रथम क्षेत्ररक्षण घेतले. त्याचा हा निर्णय चुकीचा ठरला. कोलाकाताने 20 षटकात 8 बाद 163 धावा केल्या.

मिशल जॉन्सनने कर्णधार गौतम गंभीरला 1 धावावर टिपले. उथप्पा आणि मनीष पांडेने दुसर्‍या जोडीस 65 धावाची भागीदारी 7 षटकात केली. अक्षर पटेलने उथप्पाला टिपले. तने 30 चेंडूत 4 चौकार 2 षटकारासह 42 धावा केल्या. मनीष पांडे 21, शाकीब अल हसन 18, युसूफ पठाण 20 यांनी धावफलक हलता ठेवला. परंतु डोईश्चटे (10 चेंडूत 2 षटकार 17), र्सूकुमार यादव (14 चेंडूत 3 चौकार 1 षटकार 20) आणि पियुष चावला (9 चेंडू 3 चौकार, नाबाद 17) या तिघांनी झटपट धावा वाढविल्या. पंजाबकडून अक्षर पटेलने 4 षटकात 11 धावात 2 गडी टिपले, जॉन्सनने 31 धावात 2 तर करणवीर सिंगने 40 धावात 3 गडी टिपले.

पंजाबची सुरुवात खराब ठरली. उमेश यादवने सेहवागला 2 धावावर टिपले. मनन वोहरा आणि रिद्दीमान साहा या दोघांनी दुसर्‍या जोडीस 40 धावांची भर घातली. त्यावेळी मोरकेलने वोहाराला (26) टिपले. उमेश यादवने ग्लेन मॅक्सवेलचा (6) महत्त्वाचा बळी टिपला. तर चावलाने मिलेरचा (8) त्रिफळा घेतला.

उमेश यादवने साहाला (35) टिपले. कर्णधार बेलीने 26 धावा काढल्या. परंतु तो संघाला विजयी करू शकला नाही.