शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. क्रिकेट मराठी
  4. »
  5. क्रिकेट वृत्त
Written By वेबदुनिया|
Last Modified: नवी दिल्ली , गुरूवार, 11 ऑगस्ट 2011 (11:56 IST)

क्रिकेट 'ऑस्कर'साठी जहीर खानचे नामांकन

PR
दुखापतीमुळे पुढील चार महिने क्रिकेट खेळण्यास असमर्थ ठरलेला भारताचा वेगवान गोलंदाज झहीर खान याचे आयसीसीच्या वार्षिक पुरस्कारांमध्ये तीन वेगवेगळ्या गटात नामांकन करण्यात आले आहे.

12 सप्टेंबरला लंडन येथे या पुरस्कारांचे वितरण होईल. झहीरशिवाय राहुल द्रविड, सचिन तेंडुलकर, कर्णधार महेंद्रसिंग ढोणी यांना दोन गटासाठी नामांकित करण्यात आले आहे.

झहीरशिवाय इतर पाच क्रिकेटर इंग्लंडचा जोनाथन ट्रॉट आणि ग्रॅम स्वॅन, दक्षिण आफ्रिकेचा एबी डिव्हिलियर्स, हाशिम अमला व ऑस्ट्रेलियाचा शेन वॅटसन यांचा समावेश आहे.

झहीरला आयसीसी क्रिकेटर ऑफ द इयर, सर्वोत्कृष्ट कसोटीपटू व सर्वोत्कृष्ट वनडे क्रिकेटपटू या गटासाठी नामांकन मिळाले आहे.

तेंडुलकर आणि द्रविड यांनादेखील वर्षातील सर्वोत्कृष्ट क्रिकेटपटू तसेच सर्वोत्तम कसोटीपटूंच्या यादीत स्थान मिळाले आहे. ढोणीचे नाव सर्वोत्कृष्ट वनडे खेळाडू तसेच लोकांच्या पसंतीचा खेळाडू म्हणून समाविष्ट करण्यात आले आहे .

आयसीसी पुरस्कारांसाठी ज्यांची नामांकन निश्चित झाली आहेत, त्यातील भारतीय खेळाडूंत इशांत शर्मा व हरभजनसिंग (सर्वोत्कृष्ट कसोटीपटू ), गौतम गंभीर, विराट कोहली, मुनाफ पटेल, वीरेंदर सेहवाग व युवराजसिंग ( सर्वोत्कृष्ट वनडे खेळाडू), झुलन गोस्वामी व पूनम राऊत (सर्वोत्कृष्ट महिला क्रिकेटपटू) तर अभिनव मुकुंद ( उदयोन्मुख क्रिकेटपटू) यांचा समावेश आहे.

दहा वैयक्तिक पुरस्कारांसमवेत या पुरस्कांमध्ये सर्वोत्कृष्ट कसोटीपटू, सर्वोत्कृष्ट वनडे खेळाडू व क्रिकेटर ऑफ द इयर पुरस्कार सामील आहे.