शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. वृत्त-जगत
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified: गुरूवार, 27 नोव्हेंबर 2014 (12:19 IST)

क्रिकेटपटू फिल ह्युजचा मृत्यू

शेफिल्ड शील्ड सामन्यादरम्यान बाऊन्सर डोक्यावर आदळून कोमात गेलेला ऑस्ट्रेलियाचा फलंदाज फिल ह्युज याचा मृत्यू झाला आहे.  कसोटी संघात पुनरागमन करण्यासाठी धडपडणा:या ह्युजला सून एबट याचा बाऊन्सर लागला होता. त्याच्यावर सेंट व्हिन्सेंट इस्पितळात तातडीची शस्त्रक्रिया करण्यात आली होती. 
 
ह्युजने जुने आणि हलक्या दर्जाचे हेल्मेट घातले होते
फिल ह्युजच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्यानंतर क्रिकेटमध्ये सुरक्षेच्या उपायासाठी वापरण्यात येणा:या वस्तूंच्या दर्जाबाबत चर्चा सुरू झाली आहे. ह्युजने दुर्घटनेच्या वेळी घातलेले हेल्मेट जुने तसेच हलक्या दर्जाचे होते, असे हेल्मेट बनविणारी कंपनी ‘मासुरी’ने स्पष्ट केले.