गुरूवार, 18 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. क्रिकेट मराठी
  4. »
  5. क्रिकेट वृत्त
Written By वेबदुनिया|

ख्रिस गेलचे क्रिकेट इतिहासातील सर्वात वेगवान शतक

ख्रिस गेलने अवघ्या ३० चेंडूत १०२ धावा तडकावून क्रिकेट इतिहासातील सर्वात वेगवान शतक झळकवले. याअगोदर युसूफ पठान व शाहिद आफ्रिदीच्या नावांवर हा विक्रम होता. पुणे वॅरियर्स विरूद्ध स्फोटक खेळी करताना त्याने १७ उत्तुंग षट्कार व १३ चौकार खेचले.

आयपीएल व टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावांचा विक्रम ब्रँडन ‍मॅक्कुलमच्या नावावर आहे. आयपीएल इतिहासातील पहिल्याच सामन्यात त्याने नाबाद १५७ धावा तडकावून टी-२० क्रिकेटची नांदी स्पष्ट केली होती.

यानंतर त्याचा वारसा चालवला तो ख्रिस गेलने. आयपीएलमध्ये ४ शतकं ठोकणारा गेल एकमेव फलंदाज आहे. मॅक्कुलचा वारसा खर्‍या अर्थाने चालवला तो ख्रिस गेलने आणि त्याचा विक्रमही अखेर त्यानेच तोडला. गेलने नाबाद १७५ धावा केल्या आहेत.

टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक १७ षट्कार खेचण्याच्या विक्रमही त्याने मोडित काढला. ग्रॅहम नेपीयरने काउंटी क्रिकेटमध्ये १६ षट्कार खेचले होते.

FILE