शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. क्रिकेट मराठी
  4. »
  5. क्रिकेट वृत्त
Written By वेबदुनिया|

ख्रिस गेलच्या रूममधून तीन ब्रिटीश तरुणींना अटक!

WD
वेस्ट इंडिज संघाचा स्टार खेळाडू ख्रिस गेलच्या रूममधून तीन ब्रिटिश महिलांना श्रीलंकन पोलिसांनी अटक केली आहे. या तरुणी गेलच्या रूममध्ये नक्की काय करीत होत्या आणि त्यांना प्रवेश कुणी दिला, याबाबत मात्र गूढ कायम आहे. येथील पंचतारांकित सिनामून ग्रॅण्ड हॉटेलमध्ये वेस्ट इंडिज संघ थांबला आहे. श्रीलंकेत सध्या आयसीसी टी-20 विश्वचषक स्पर्धा सुरू असल्यामुळे विंडीज संघ या हॉटेलमध्ये थांबला आहे.

खेळाडूंच्या सुरक्षेसाठी तैनात करण्यात आलेल्या सुरक्षा दलाच्या जवानांनी या तरुणींना अटक करून त्यांना चौकशीसाठी पोलिसांच्या स्वाधीन केल्यानंतर चौकशीसाठी त्यांना नजीकच्या पोलिस ठाण्यात नेण्यात आले. दरम्यान, आयसीसीने याबाबत काहीही आक्षेप घेतला नाही व त्यांच्याविरुद्ध तक्रारही दाखल केली नसल्यामुळे या तरुणींना सोडण्यात आले. मात्र त्यांना गरज पडल्यास चौकशीसाठी हजरराहावे लागेल, असे बजवण्यात आले. या तरुणी खेळाडूंच्या खोलीत कशासाठी प्रवेश करीत होत्या, याचे कारण समजू शकले नाही.