गुरूवार, 18 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Updated : गुरूवार, 19 मार्च 2015 (17:01 IST)

जाणून घ्या भारतीय क्रिकेटरच्या बायकांबद्दल

भारतीय क्रिकेट टीम सध्या वर्ल्ड कपात धमाल करत आहे. आम्ही जाणून घेऊ भारतीय क्रिकेट टीमचे धुरंधर खेळाडूंच्या बायकांबद्दल.   

 
साक्षी धोनी (महेंद्र सिंह धोनीची बायको) : भारतच्या सर्वात यशस्वी कर्णधारासोबत लग्न करून चर्चेत आलेली साक्षी सिंह रावत महेंद्रसिंह धोनीच्या बालपणाची मैत्रीण होती आणि दोन्ही कुटुंबांमध्ये सुरुवातीपासूनच आपलेपणा होता. साक्षी होटल मॅनेजमेंटमध्ये औरंगाबादच्या एका कॉलेजमधून ग्रेज्यूएट आहे. साक्षीचा कुटुंब रांचीहून डेहराडूनमध्ये स्थायिक झाल्यानंतर माही आणि साक्षीची भेट एकवेळा परत कोलकाताच्या ताज बेंगालमध्ये झाली जेथे भारतीय क्रिकेट टीम पाकिस्तानविरुद्ध एका सामन्यासाठी थांबलेली होती आणि साक्षी आपल्या होटल मॅनेजमेंटची ट्रेनिंग घेत होती. 4 जुलै, 2010मध्ये धोनीने साक्षीसोबत लग्न केले.  
 
पुढील पानावर, भेटा स्टुअर्ट बिन्नीच्या बायकोशी ...
मयंती लँगर (स्टुअर्ट बिन्नीची बायको) : भारतीय ऑलराउंडर स्टुअर्ट बिन्नीची बायको मयंती लँगर (Mayanti Langer) एक प्रख्यात टीव्ही चॅनलमध्ये खेळ वार्ताहर म्हणून कार्यरत आहे. तिने चॅनलसाठी फुटबॉल कॅफे, झी स्पोर्ट्स, 2010 फीफा वर्ल्ड कप, 2010 कॉमन वेल्थ गेम्स, 2011 क्रिकेट वर्ल्ड कप, फर्स्ट सुपर लीग 2014 आणि 2015 आयसीसी वर्ल्ड कप सारखे शो होस्ट केले आहेत.
 
तिचे वडील लेफ्टिनेंट जनरल संजीव लँगर यांनी युनायटेड नेशंसमध्ये काम केले आहे आणि तिची आई प्रीमिंडाने शिक्षेच्या क्षेत्रात आपले योगदान देऊन बरेच पुरस्कार जिंकले होते. मयंती दिल्लीच्या हिंदू कॉलेजहून बीए हॉनर्स ग्रॅज्युएट आहे. स्टुअर्ट बिन्नी आणि मयंती लँगरचे लग्न 2013 मध्ये झाले.

पुढील पानावर, मोहम्मद शमीची बायको ...
हसीन जहां (मोहम्मद शमीची बायको) : माजी मॉडल हसीन जहांची भारतीय गोलंदाज मोहम्मद शमीसोबत मुरादाबादमध्ये 6 जून 2014ला एका निजी समारंभात लग्न झाले. हसीन आणि शमीची भेट इंडियन प्रीमियर लीगच्या एका सामन्यात झाली होती. हसीनचे जन्म कोलकाताच्या एका मुस्लिम कुटुंबात झाले होते. तिचे वडील मोहम्मद हसन एक यशस्वी व्यवसायी असून त्यांचा ट्रांसपोर्टचा बिझनेस आहे. तिची आई एक हाउसवाइफ आहे. 2014मध्ये लग्नाअगोदर शमी आणि हसीन 2 वर्षांपर्यंत एक दुसर्‍यांना डेट करत होते आणि या दरम्यान हसीन जहांने शमीचे सर्व सामने प्रेक्षक बनून बघितले. 
पुढील पानावर, भेटा रहाणेची बायको राधिकाशी ...

राधिका धोपावकर (अजिंक्य रहाणेची बायको) : भारतीय फलंदाज अजिंक्य रहाणे आणि राधिका धोपावकर यांची अरेंज मॅरिज होती. राधिका धोपावकरचे वडील नंदकुमार धोपावकर मर्चैंट नेव्हीमध्ये होते आणि वर्तमानात ते आतिथ्य हॉस्पिटेलिटी प्रायवेट लिमिटेडमध्ये कार्यरत आहे. तिची आई अनुजा धोपावकर आतिथ्य हॉस्पिटेलिटी प्रायवेट लिमिटेडमध्ये कार्यकारी निर्देशक आहे. आतिथ्य हॉस्पिटेलिटी प्रायवेट लिमिटेड राधिकाचा कौटुंबिक बिझनेस आहे. ती मुंबईच्या मुलुंड भागातील आहे.  राधिका केलकर एज्युकेशन ट्रस्टच्या विनायक गणेश वैज कॉलेजहून स्नातक आहे. राधिका आणि अजिंक्य रहाणे एक दुसर्‍यांना बर्‍याच वेळापासून ओळखतात आणि बालपणाचे मित्र आहे. 26 सप्टेंबर 2014ला अजिंक्य आणि राधिकाचे मुंबईत लग्न झाले.  
 
पुढील पानावर, भेटा शिखर धवनच्या बायकोशी  
आयशा मुखर्जी (शिखर धवनची बायको) : भारताचे यशस्वी क्रिकेटरमध्ये आपले नाव सामील करणारे शिखर धवनचे आयशा मुखर्जीसोबत  30 ऑक्टोबर 2012मध्ये सिख विधीनुसार दक्षिणी दिल्लीच्या वसंत कुंजच्या एका गुरुद्वारामध्ये लग्न झाले होते. 38 वर्षीय ऑस्ट्रेलियन आयशा एंग्लो-इंडियन पण बंगाली वडिलांची संतानं असल्याने ती बंगाली भाषेत निपुण आहे.  आयशाच्या शाळा आणि कॉलेजपर्यंतचे शिक्षण ऑस्ट्रेलियामध्ये झाले आणि तिच्याजवळ स्नातकाची उपाधी आहे. टॅटूची खास शौकिन आयशा खेळांमध्ये देखील रुची ठेवते आणि बर्‍याच सामन्यांमध्ये राष्ट्रीय स्तरावर मुक्केबाजी करते. आयशाचे शिखर धवनसोबत दुसरे लग्न आहे या अगोदर ती ऑस्ट्रेलियाच्या एका व्यवसायीची बायको राहून चुकली आहे आणि त्याच्यापासून तिला दोन मुली देखील आहेत. आयशा आणि शिखर धवनची भेट फेसबुकच्या माध्यमाने झाली होती.  
पुढील पानावर, अश्विनची बायको ...
प्रीति नारायण (आर अश्विनची बायको) : भारतीय गोलंदाज आर अश्विनची बायको प्रीति नारायण दक्षिण भारतीय असून तिचा जन्म चेन्नईमध्ये झाला आहे. आर अश्विन आणि प्रीतिने चेन्नईच्या पद्मा शेशाद्री बाल भवन विद्यालयातून शिक्षा ग्रहण केली आहे आणि दोघेही बालपणाचे मित्र आहे. त्यांच्या कुटंबात घनिष्ट संबंध होते. प्रीती चेन्नईच्या एस एन कॉलेजमधून इंजिनियरिंगामध्ये स्नातक आहे. आर अश्विनने देखील याच कॉलेजमधून इंफरमेशन टेक्नॉलॉजीमध्ये स्नातकाची उपाधी घेतली आणि कॉलेज दिवसांपासूनच आर अश्विन आणि प्रीती एक दुसर्‍यांना डेट करत होते. 13 नोव्हेंबर 2011ला दक्षिण भारतीय परंपरेनुसार दोघांचे लग्न झाले.