शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. क्रिकेट मराठी
  4. »
  5. क्रिकेट वृत्त
Written By वेबदुनिया|

जावेद मियांदादचा भारत दौरा रद्द!

WD
पाकिस्तानचा माजी कर्णधार जावेद मियांदादचा भारत दौरा रद्द झाल्याची माहिती पाकिस्तानच्या प्रसारमाध्यमांनी दिली. भारत आणि पाकिस्तान यांच्यादरम्यान येत्या रविवारी, 6 जानेवारी रोजी होणारा तिसरा एकदिवसीय क्रिकेट सामना पाहण्यासाठी जावेद मियांदाद भारतात येणार होता. मियांदादचा भारताने 'व्हिसा' मंजूर केल्यानंतर भारतात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या. पाकिस्तानने एकदिवसीय मालिका जिंकल्यामुळे मियांदादने भारत दौरा रद्द केला आहे, असे वृत्त पाकिस्तानी प्रसारमाध्यमांनी दिले आहे.

मुंबईत 1993 मध्ये झालेल्या बॉम्बस्फोट मालिकेतील मुख्य आरोपी आणि मोस्ट वॉन्टेड अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा व्याही जावेद मियांदाद नवी दिल्ली येथील सामन्याला उपस्थित राहणार होता. तब्बल सात वर्षांनंतर तो भारतात येणार होता. मियांदादचा मुलगा जुनेद याचा निकाह 2005 मध्ये दाऊदची मुलगी माहरुखशी झाला होता. त्यानंतर मियांदादसाठी भारताचे दरवाजे बंद झाले होते. भारताने 2005मधील पाक संघाच्या दौर्‍यादरम्यान मियांदादला 'व्हिसा' नाकारला होता, असे वृत्त पाकमधील प्रसारमाध्यमांनीच दिले आहे.