गुरूवार, 28 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified: नवी दिल्ली , मंगळवार, 1 डिसेंबर 2015 (09:12 IST)

दिलीप वेंगसरकर यांची एनसीएच्या प्रमुखपदी नियुक्ती

भारताचे माजी क्रिकेट कर्णधार दिलीप वेंगसरकर यांची भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) बंगळूर येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचे संचालक म्हणून नियुक्ती केली आहे. बीसीसीआयचे अध्यक्ष शशांक मनोहर यांनी ही घोषणा केली. मुंबई क्रिकेट संघटनेचे उपाध्यक्ष दिलीप वेंगसरकर यांनीसुद्धा या वृत्ताला दुजोरा दिला आहे. बीसीसीआयचे नवे अध्यक्ष शशांक मनोहर यांनी कॉन्फ्लिक्‍ट ऑफ इंटरेस्टवर कडक धोरण स्वीकारल्यानंतर बृजेश पटेल यांनी हे पद सोडले. त्यानंतर दिलीप वेंगसरकर यांची निवड करण्यात आली आहे. राष्ट्रीय क्रिकेट अकादमी ही सक्षम करणे हे पहिले उद्दीष्ट आहे, असे मत दिलीप वेंगसरकर यानी व्यक्त केले आहे.