गुरूवार, 28 मार्च 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. क्रिकेट मराठी
  4. »
  5. क्रिकेट वृत्त
Written By वेबदुनिया|

दिल्लीस हरवत कोलकाता फायनलमध्ये दाखल

गौतम गंभीरच्या कुशल नेतृत्वाच्या भरवशावर कोलकाता नाइट रायडर्सने विरेंद्र सेहवागच्या दिल्ली डेअरडेव्हिल्सचा अश्वमेघ रोखत फायनलमध्ये प्रवेश केला आहे.

PTI
PTI
आयपीएल स्पर्धेत कोलकाता प्रथमच फायनलमध्ये पोहचला आहे. लक्ष्मी रतन शुक्ला आणि युसूफ पठाण यांनी पाचव्या विकेटसाठी शेवटचच्या चार षटकात केलेल्या नाबाद ५६ धावा विजयात महत्त्वाच्या ठरल्या.

या दोघांनी वरूण आरन याने टाकलेल्या सामन्याच्या शेवटच्या षट्कात २१ धावा कुटत कोलकात्यास १६२ धावांचा पल्ला गाठून दिला.

गौतम गंभीरने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. गंभीरने डावाची धडाकेबाज सुरूवात करत सुरूवातीलाच इरादे स्पष्ट केले. त्याने पहिल्या गड्यासाठी मॅकल्लम सोबत ५.५ षट्कात ४८ धावांची भागिदारी केली. मात्र नंतर तो अनपेक्षितपणे धावबाद झाल्याने कोलकात्याच्या धावांची गती मंदावली. मात्र शेवटच्या षट्कातील युसूफ व शुक्लाच्या मारपीटीने कोलकाता सन्मानजनक धावसंख्या उगारू शकला.

त्यांनी दिल्लीसमोर विजयासाठी १६३ धावांचे लक्ष ठेवले मात्र दिल्ली १४४ धावांपर्यंतच मजल गाठू शकली. गौतम गंभीरने तिन फिरकी गोलंदाज खेळवत पुण्याच्या खेळपट्टीचा चांगला फायदा उठवला. गोलंदाजांचा योग्य वेळी उपयोग करण्याचे गंभीरचे धोरण चांगलेच यशस्वी ठरले. त्याने सुनिल नरीन सारख्या विकेट टेकर गोलंदाची षट्क शेवटच्या स्लॉग ओव्हर्ससाठी शिल्लक ठेवली. दिल्लीवर कायम दबाव कायम ठेवला आणि कोलकाता फायनलमध्ये पोहचला.