गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By

धोनी- सपनाचा व्हिडिओ व्हायरल

जिथे टीम इंडिया या वर्षी मार्च- एप्रिलमध्ये होणार्‍या ट्वेंटी-20 विश्वचषकाच्या तयारीत आहेत तिथे धोनी आणि त्याची हेअर स्टाइलिस्ट सपना भावनानीचा एक व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ आतापर्यंत लाखो लोकं बघून चुकले आहेत.
 
खरंतर भारत-ऑस्ट्रेलियासह टी-20 विश्वचषकाचे अधिकृत प्रसारक स्टार स्पोर्ट्सने मागल्या वर्षी विश्वचषकादरम्यान 'मौका-मौका' या जाहिरातीची शृंखला केली होती जी खूप लोकप्रिय झाली होती आणि आता ते नवीन व्हिडिओ 'आप भी अपनी तैयारी कर लो' यासह प्रस्तुत आहे.


 
स्टार स्पोर्ट्सच्या एका व्हि‍डिओत भारतीय कर्णधार महेंद्रसिंग धोनी आणि त्याची हेअरस्टाइलिस्ट सपना भावनानी दिसून येत आहे. ट्वेंटी-20 विश्वचषक 8 मार्च ते 3 एप्रिलपर्यंत आयोजित करण्यात येणार आहे. स्टार स्पोर्ट्सच्या अधिकृत ट्विटर हँडलवर हा व्हिडिओ शेअर केला असून लिहिले आहे की- आता वेळ आली आहे फॅन्सच्या तयारीची टीम इंडिया आणि धोनीला टी-20 वर्ल्ड कप जिंकवण्यात मदत करण्यासाठी. आपली काय तयारी आहे? 
 
व्हिडिओमध्ये सपना आणि धोनी नवीन हेअरस्टाइल डिस्कस करताना दिसतात आहे. यात सपना धोनीला 2007 मधील सर्वात फेमस लॉगहेअर कट ट्राय करण्यासाठी म्हणते, तरी शेवटपर्यत ते कोणत्याही निष्कर्षापर्यंत पोहचत नाही.
 
धोनीचा मजेदार व्हिडिओ पाहण्यासाठी पुढे जा....