शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Updated : मंगळवार, 7 जुलै 2015 (13:08 IST)

धोनीच्या वाढदिवसानिमित्त जाणून घ्या, या गोष्टी

भारतीय एकदिवसीय संघाचा कर्णधार महेंद्र सिंग धोनीचा आज 34वा वाढदिवस आहे. रांची सारख्या लहान घरापासून आपल्या जीवनाची सुरुवात करणारा धोनी आज भारतीय क्रिकेट संघाचा बेताज बादशाह आहे.  
 
धोनी ज्याला त्याचे मित्र माही म्हणून हाक मारतात, त्याचा जन्म 7 जुलै 1981ला एका मध्यमवर्गीय परिवारात झाला होता. धोनीचे वडील पान सिंह एका कंपनीत ज्युनियर मॅनेजमेंट कर्मचारीच्या रूपात काम करत होते. धोनीच्या हजेरीत भारताने टी20 विश्व कप 2007, क्रिकेट विश्व कप 2011मध्ये विजय मिळवला आहे.   
 
धोनीच्या वाढदिवसा निमित्त आम्ही तुम्हाला त्याच्याशी निगडित काही माहिती देण्याचा प्रयत्न करीत आहो -
 
1. हे तर तुम्हाला माहीत आहे की धोनीचा जन्म रांचीत झाला, पण काय तुम्हाला माहीत आहे की त्याचे आई वडील उत्तरांचलाचे आहे. त्यांचा पैतृक गांव अल्मोड़ाहून 40 किमी.च्या अंतरावर आहे.   
 
2. धोनी पश्चिम बंगालच्या खड़गपुर रेल्वे स्टेशनवर टिकत जिल्हाधिकारीम्हणून काम करत होता. ही गोष्ट आहे 2001-2003 दरम्यानाची, त्याने या अगोदर रणजीमध्ये पर्दापण केले होते. 

3. धोनी क्रिकेटमध्ये येण्या अगोदर आपल्या शाळेच्या फुटबॉल टीमचा गोलकीपर होता.  
 
4. धोनी झारखंड राज्यात सर्वात जास्त 'कर' देणारा व्यक्ती आहे. धोनीने 2013-14मध्ये 20 कोटी रुपये इन्कम टॅक्सच्या स्वरूपात दिले.
5. धोनीला एक बहीण (जयंती) आणि भाऊ (नरेंद्र) आहे. त्याची बहीण रांचीमध्ये इंग्लिश टीचर आणि भाऊ राजकारणाशी जुळलेला आहे.  
 
6. धोनीला बाइक आणि कारची आवड आहे, म्हणून त्याच्याजवळ बर्‍याच बाइक्स व कारी आहेत.   
 
7. धोनीने डेहराडूनमध्ये राहणार्‍या साक्षीशी लग्न केले. साक्षी धोनीपेक्षा 8 वर्ष लहान आहे. दोघांची एक मुलगी आहे जिचे नाव जीवा आहे. 
 
8. धोनी भारतीय सेनेत लेफ्टनंट कर्नल आहे. त्याला ही रॅक त्याला 2011मध्ये देण्यात आली होती. त्याने नंतर सांगितले की आर्मीत सामील होणे त्याचे बालपणाचे स्वप्न होते.  
 
9. धोनीला कर्णधार म्हणून सर्वात यशस्वी मानले जाते. त्याच्या कप्तानीत भारतीय संघाने सर्वात जास्त टेस्ट आणि एकदिवसीय सामने जिंकले आहे.
  
10. धोनी भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार 2007मध्ये बनला. त्या वेळेस राहुल द्रविड संघाचा कर्णधार म्हणून काम करत होता.  
11. धोनी एकटा असा कर्णधार आहे ज्याच्या कप्तानीत भारतीय संघाने ICCच्या तिन्ही लिमिटेड ऑवर्स असणार्‍या ट्राफ्या (वर्ल्ड कप, चँपियंस ट्राफी आणि T-20 वर्ल्ड कप) जिंकले आहे.  
 
12. धोनीच्या कप्तानीत भारतीय संघाने 2011मध्ये ICC च्या रँकिंगमध्ये पहिला स्थान मिळविला होता.  
 
13. धोनी एअर इंडियाच्या रांची ब्रांचमध्ये डेप्युटी मॅनेजरच्या पदावर देखील राहून चुकला आहे आणि एअर इंडियानुसार तो रोज ऑफिसमध्ये हजेरी लावत होता पण तेव्हा खेळत नव्हता.  
 
14. धोनीला बर्‍याच किताब मिळाल आहे. ICC च्या एकदिवसीय सर्वात उत्कृष्ट खेळाडूचा किताब, राजीव गांधी खेल रत्न, पद्मश्री त्यात सर्वात खास आहे.  
 
15. आपल्या शाळेतील जीवनात धोनी जिल्हा आणि क्लब स्तरावर फुटबॉल आणि बॅडमिंटन खेळत होता.  
 
16. धोनीच्या फुटबॉल कोचाने त्याला प्रथमच क्लब स्तराचे क्रिकेट खेळायला पाठवले होते. त्याने या अगोदर कधीही क्रिकेट खेळले नव्हते पण तरीही त्याने आपल्या विकेट कीपिंगमुळे सर्वांना प्रभावित केले होते.