शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By

नरेंद्र मोदींनी घेतली राष्ट्रीय खेळाडूंची भेट

नवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रिओ ऑलिम्पिक विजेत्या पी.व्ही. सिंधू, साक्षी मलिक यांच्यासह राष्ट्रीय खेळाडूंची मोदींनी त्यांना निवासस्थानी निमंत्रित करून भेट घेतली.
 
राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराचे आज राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते वितरण होणार आहे. हा पुरस्कार रिओ ऑलिम्पिक रौप्पदक विजेत पी.व्ही. सिंधू, कांस्पदक विजेती साक्षी मलिक, दीपा करमाकर आणि जितू राय यांना घोषित झाला आहे. सिंधू यांनी महिला एकेरी बॅडमिंटनमध्ये रिओ ऑलिम्पिकमध्ये रौप्पदक मिळवून इतिहास घडविला आहे. महिलांच्या 58 किलो वजनी गटात साक्षी मलिक हिने कांस्पदक पटकाविले आहे. पुरस्कार वितरण कार्यक्रमाच्या पाश्र्वभूमीवर पंतप्रधान मोदी यांनी या खेळाडूंना त्यांच्या 7 रेसकोर्स मार्गावरील निवासस्थानी निमंत्रित केले होते.
 
या भेटीनंतर बोलताना पी.व्ही. सिंधू म्हणाली, मी माझे पदक पंतप्रधानांना दाखवताच ते खूपच आनंदित झाले. त्यांनी माझे अभिनंदन केले. तू खरोखरच भारताचा अभिमान वाटावा, अशी कामगिरी केली आहेस. मला खूप आनंद झाला आहे, असेही त्यांनी म्हटलचे तिने सांगितले.