शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. क्रिकेट मराठी
  4. »
  5. क्रिकेट वृत्त
Written By वेबदुनिया|

न्यूझीलँडचे क्रिकेटपटू मार्टीन क्रो यांना कँसर

FILE
न्यूझीलँडचे माजी कसोटीपटू मार्टीन क्रो कँसरने ग्रस्त असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यांना लिम्फो कँसर झाल्याचे त्यांचे व्यवस्थापक लुईस हँडरसन यांनी सांगितले. हा आजार शरीराचा रोगांपासून बचाव करणार्‍या पांढर्‍या रक्त पेशींना प्रभावित करते.

या वृत्तामुळे त्यांचे कुटींबीयांना धक्का बसला आहे. ५० वर्षीय क्रो यांनी ७७ टेस्ट मधून ५४४४ धावा केल्या असून यामध्ये १७ शतकांचा समावेश आहे. प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये २० हजार धावांपासून ते अवघे ३९२ धावा दूर असून यासाठी त्यांनी प्रथमश्रेणीत पुनरागमन करण्याची इच्छा व्यक्त केली होती.

क्रिकेटपासून कधीच दूर न राहण्याचे व्रत घेतलेले क्रो यांनी ४९ व्या वर्षी घरगुती संघासाठी मुख्य खेळाडू व कर्णधाराची भूमिका बजावली होती.