गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified: मंगळवार, 13 ऑक्टोबर 2015 (11:12 IST)

पंच विनित कुलकर्णींविरोधात तक्रार

इंदूर- दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या ट्वेंटी-20 आणि एकदिवसीय सामन्यात वादग्रस्त निकाल देणारे पंच विनित कुलकर्णी यांच्याविरोधात भारतीय क्रिकेट संघ व्यवस्थापनाने बीसीसीआयकडे तक्रार केली आहे.
 
पहिल्या ट्वेंटी-20 सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्या जेपी ड्युमिनीला कुलकर्णी यांनी पायचीत बाद दिले नव्हते. त्यानंतर पहिल्या एकदिवसीय सामन्यात शिखर धवनला वादग्रस्त पायचीत बाद दिले होते. तसेच याच सामन्यात फाफ डू प्लेसिसविरुध्द अश्विन जोरदार अपील करूनही बाद दिले नव्हते. 
 
भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीनेही ट्वेंटी-20 मालिकेनंतर पंचांच्या काही निर्णयांमुळे आम्हाला पराभव स्वीकारावा लागल्याचे म्हटले होते.  तर, एकदिवसीय मालिकेतही भारतीय संघ 1-0 ने पिछाडीवर आहे. अशा काही निर्णयामुळे नाराज झालेल्या भारतीय क्रिकेट संघ व्यवस्थापनाने त्यांची तक्रार बीसीसीआयकडे केली आहे.