गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified: नवी दिल्ली , बुधवार, 16 मार्च 2016 (11:06 IST)

भारत-पाकिस्तान सामन्याची तिकिटे लॉटरी पद्धतीने सुरू

भारत-पाकिस्तान सामना सुरक्षेच्या कारणास्तव हिमाचल प्रदेशातील धरमशालाऐवजी कोलकात्याच्या ईडन गार्डनवर होणार आहे. त्यामुळे भारत-पाक क्रिकेट सामन्याची ‘लॉटरी तिकीट’ प्रक्रिया पुन्हा सुरु करण्यात आली आहे. बीसीसीआयने याबाबत माहिती देताना म्हटलं की, देश आणि परदेशातील क्रिकेट चाहत्यांसाठी ऑनलाइन नोंदणीची सुविधाही उपलब्ध आहे. 
 
नोंदणी केल्यानंतर लॉटरी प्रक्रियेतून विजेत्यांची नावं घोषित केली जातील आणि या लॉटरीतील विजेत्यांना तिकीट मिळणार आहे.'
 
बुक माय शो डॉट कॉम’ या वेबसाईटवरही नोंदणी ङ्खॉङ्र्क उपलब्ध आहे, असे बीसीसीआयकडून सांगण्यात आले आहे. रँडम ड्रॉमधून विजयी ठरलेल्यांना आपला आवडता सामना पाहण्याची संधी मिळणार आहे. 
 
विजयी ठरलेल्या चाहत्यांना तिकिटाचे पैसे भरण्यासाठी एक लिंक पाठवली जाईल, त्या लिंकवर जाऊन चाहत्यांना पैसे भरावे लागणार आहेत.