शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified: गुरूवार, 1 ऑक्टोबर 2015 (10:25 IST)

मनोहर यांच्या निवडीची औपचारिकता बाकी

मुंबई- शशांक मनोहर भारतीय क्रिकेट मंडळाचे पुन्हा अध्यक्ष होणार आहे, ही आता केवळ औपचारिकता आहे. जगमोहन दालमिया यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या या पदासाठी नवा अध्यक्ष निवडण्याकरिता बीसीसीआयची रविवारी 4 ऑक्टोबर रोजी मुंबईत विशेष सर्वसाधारण सभा होत आहे.

अध्यक्षपदासाठी मनोहर हे एकमेव उमेदवार असल्याचे सचिव अनुराग ठाकुर यानी जाहीर केल्यामुळे ते रविवारी अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारतील हे निश्चित झाले आहे. बीसीसीआयमधील घडामोडींना आता वेग आला आहे. नवा अध्यक्ष निवडण्यासाठी विशेष कार्यकारी समितीची बैठक मुंबईतील मुख्यालयात रविवारी दुपारी 2 वाजता होईल, असे बीसीसीआयकडून जाहीर करण्यात आले.