शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. क्रिकेट मराठी
  4. »
  5. क्रिकेट वृत्त
Written By वेबदुनिया|

मला निवृत्तीचा सल्ला देण्याची गरज नाही - सचिन

WD
23 वर्षे क्रिकेट मैदान गाजवणार्‍या सचिनच्या महाशतकानंतर निवृत्तीच्या चर्चांना उधाण आले होते. यावर बोलताना सचिन म्हणाला, जे लोक निवृत्तीच्या सल्ला मला देत आहेत, त्यांनी ना मला खेळायला शिकवले, ना मला भारतीय संघात आणले. त्यामुळे अशा लोकांनी मला निवृत्तीचा सल्ला देण्याची गरज नाही, असे सागंत त्यांना चपराक दिली. निवृत्ती घेण्याचा निर्णय माझा स्वत:चा आहे.

मला जेव्हा वाटेल की, भारतासाठी चांगली कामगिरी करण्यासाठी मी असमर्थ आहे तेव्हाच निवृत्ती घेईन, असेही त्याने निक्षून सांगितले. क्रिकेट हेच माझे आयुष्य आहे आणि मी अजूनही चांगला खेळू शकतो. मी स्वत:साठी किंवा केवळ विक्रम करण्यासाठी कधीच खेळत नाही. माझ्यासाठी केवळ संघाचा विजय महत्त्वाचा आहे आणि मी देशासाठी खेळतो.

यापुढेही मला खेळाचा आनंद लुटायचा आहे, असे मास्टर ब्लॉस्टरने सांगितले. एखाद्या यशाच्या शिखरावर असताना आपण निवृत्ती घ्यावी, असे अनेकांचे म्हणणे आहे परंतु त्यांनी मला असे स्वार्थीपणाचे सल्ले कृपया देऊ नयेत. माझ्या निवृत्तीची वेळ मीच ठरवेन, अशी चपराक निवृत्तीचे सल्ले देणार्‍यांना सचिनने लगावली.