शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. क्रिकेट मराठी
  4. »
  5. क्रिकेट वृत्त
Written By वेबदुनिया|

मारहाण नंतर जेसी रायडर 'कोमा'त

WD
रेडिओ न्यूझीलंडने दिलेल्या माहितीनुसार, न्यूझीलंडचा क्रिकेटपटू जेसी रायडर याला बुधवारी रात्री ख्राईस्टचर्चमधील एका बार बाहेर जबर मारहाण करण्यात आली आहे. या मारहाणीमुळे तो कोमामध्ये गेला असून, त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.

मारहाणीत रायडरची कवटी तुटली असून अंतर्गत रक्तस्रावही झाला आहे. ख्राईस्टचर्च शहरातील मेरीवेल भागात असलेल्या एका बारबाहेर वाद झाल्याने चार जणांनी रायडरला मारहाण केली. मारहाणीत त्याच्या कवटीला गंभीर जखमा झाल्या आहेत.