शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. क्रिकेट मराठी
  4. »
  5. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified: मुंबई , बुधवार, 9 एप्रिल 2014 (10:50 IST)

'युवराजवर टीका करा, पण त्याला सुळावर चढवू नका'

आयसीसी टी-20 विश्वचषक स्पर्धेच्या फायनलमध्ये  युवराज सिंहने क्रिकेट रसिकांची निराशा केली, आणि  युवीमुळे टीम इंडियाला पराभव स्वीकारावा लागला, अशा  चर्चेला ऊत आला. सोशल नेटवर्किंगवर युवीवर अतिशय  वाईट पद्धतीने टीका होत असतांना दिसते.

खास करून व्हॉटस अॅपवर पराभवाचे खापर काहीही विचार  न करता युवीवर फोडले जात आहे. काहीही अतिउत्साही हे  मेसेजेस फॉवर्ड करतांना दिसत आहेत. मात्र, सतत टीकेचा भडीमार सहन करणर्‍या युवराजला  मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने दिलासा दिला आहे.

सचिन तेंडुलकर युवराजच्या बचावासाठी उभा राहिला आहे,  लवकरच टीकाकारांना युवराज आपली योग्यता सिद्ध करून  दाखवेल आणि शानदार बॅटिंग करतांना दिसेल, असे सचिन  तेंडुलकरने म्हटले आहे.

सचिन तेंडुलकरने आपल्या फेसबुक पेजवर लिहिले आहे,  'कालचा दिवस युवीसाठी अतिशय कठीण दिवस होता,  त्याच्यावर टीका होऊ शकते, पण यासाठी त्याला सुळावर  चढवल्या सारखे करू नका'

सचिन तेंडुलकरने युवराजच्या मागील कारकीर्द आठवणीने  सांगितली आहे. आम्हाला सर्वांना युवीच्या साहसी खेळीवर  गर्व आहे.
जेव्हा आम्ही 2007 मध्ये टी 20 वर्ल्ड कप जिंकला  होता. तसेच 2011 मध्ये वनडे वर्ल्ड कप जिंकला,  युवीच्या या साहसी, असाधारण योगदानाला आम्ही नेहमी  लक्षात ठेऊ.