मंगळवार, 23 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified: मुंबई , गुरूवार, 17 मार्च 2016 (11:34 IST)

विंडीजचा इंग्लंडवर 11 चेंडू आणि 6 विकेटस्ने विजय

आयसीसीच्या टी-20 विश्वचषक स्पर्धेतील साखळी सामन्यात वेस्ट इंडीजने ख्रिस गेलच्या स्फोटक खेळीने इंग्लंडवर 11 चेंडू व सहा गडी राखून सहज विजय मिळविला. गेलने 48 चेंडूत 5 चौकार, 11 षटकारांच्या साहाय्याने शतक केले. सॅमुअलने 37 धावा काढल्या. इंग्लंडकडून वेली, टॉपेल, रशीद व अली यांनी एकेक गडी टिपले.
 
तत्पूर्वी वेस्ट इंडीजने नाणेफेक जिंकून इंग्लंडला फलंदाजी दिली. जेसॉन रॉय (15) व अलेक्स हेल्स (28) यांनी इंग्लंडला 4.3 षटकात 37 धावांची सलामी दिली. हेल्स व जो रुट (36 चेंडू 3 चौकार 2 षटकार 48) यांनी दुसर्‍या जोडीस 55 धावांची भर घातली. 
 
रसेलने रॉयला तर बेनने हेल्सला टिपले. रसेलने रुटलाही बाद केले. त्याने 20 चेंडूत 3 षटकारासह 30 धावा केल्या. ड्वेन ब्राव्होने त्याला  टिपल्यामुळे इंग्लंडची धावगती मंदावली. कर्णधार क्षन मोर्गन (नाबाद 27) आणि बेन स्टोक्स (15) यांच्यामुळे इंग्लंड संघ 20 षटकात 6 बाद 182 धावा करू शकला. वेस्ट इंडीजच्या महिला संघाने पाकिस्तान संघावर चार धावांनी थरारक विजय मिळविला.