शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. क्रिकेट मराठी
  4. »
  5. क्रिकेट वृत्त
Written By वेबदुनिया|

शाहरुखवर अभिनंदनाचा वर्षाव

WD
आयपीएलच्या पाचव्या हंगामाचे अजिंक्यपद पटकावणार्‍या कोलकाता नाईट रायडर्सचा मालक अभिनेता शाहरुख खान याच्यावर बॉलीवूडने अभिनंदनाचा वर्षाव केला आहे. शाहरुख, जुही व जय यांच्या या संघाने रविवारी झालेल्या अंतिम लढतीत चेन्नई सुपर किंग्जचा पराभव केला. या यशाबद्दल करण जोहर याने ट्विटरवर केकेआर व शाहरुखला आणखी शक्ती मिळाली आहे, असे म्हटले आहे. शानदार विजयाबद्दल शाहरुख तुझे अभिनंदन, असे बिपाशा बसूने म्हटले आहे. या विजयाचा शाहरुखच खरा वारसदार होता, असे राज कुंद्राने म्हटले आहे.

केकेआरने अप्रतीम कामगिरी बजावली, असे फरहान अख्तरने सांगितले. प्रती झिंटा हिने शाहरुख, गौरी व केकेआरवर स्तुतिसुमने उधळली आहेत. बादशाह व त्याच्या संघाने अखेर बाजी मारली, असे श्रेयस तळपदेने लिहिले आहे. शबाना आझमी, जेनेलिया डिसोझा यांनी शाहरुखचे अभिनंदन केले आहे.