गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. क्रिकेट मराठी
  4. »
  5. क्रिकेट वृत्त
Written By वेबदुनिया|

श्रीलंकन झंझावातासमोर टीम इं‍डियाची शरणागती

ऑस्ट्रेलियास नमवून श्रीलंकेशी दोन हात करण्यासाठी उत्ताहाने मैदानात उतरलेल्या भारतीय संघावर श्रीलंकन वाघांनी एकहाती विजय मिळवून उत्ताहावर पाणी फेरले. कॉमनवेल्थ बँक मालिकेत विजय नोंदवून त्यांनी आव्हान कायम ठेवले आहे.

पावसाच्या छायेत झालेल्या या लढतीत बहुतांश वेळ खर्ची पडल्याने पहिल्यांदा एकोणतीस षटकांचा सामना खेळण्याचे निश्चित करण्यात आले. मात्र यानंतरही पावसाने अधुनमधुन हजेरी लावल्याने डकवर्थ लुईस नियमानुसार श्रीलंकेस एकवीस षटकात एकशे चौपन्न धावांचे विजयी उद्दिष्ट देण्यात आले. सनथ जयसूर्या व दिलशानने आघाडीच्या भारतीय गोलंदाजीच्या चिंधड्या उडवत इरादे स्पष्ट केले.

जयसूर्याने अवघ्या तेरा चेंडून तडाखेबंद सत्तावीस धावा तडकावल्या. जयसूर्याच्या पतनानंतर दिलशानने सामन्याची सूत्रे हाती घेऊन बासस्ट धावा झळकावात श्रीलंकेचा विजय साकार केला. सुरूवातीस ईशांत शर्मा व हरभजनने जयसूर्या व संगकारास झटपट तंबूत पाठवून लढतीत रोमांच भरला.

मात्र यानंतर कर्णधार जयवर्धने व दिलशानने सुरेख खेळी करत भारताची सामन्यात परतण्याची संधी हिरावून घेतली. भारताकडून रोहित शर्माने या सामन्यातही भक्कम व आकर्षक खेळाचा नमुना सादर केला.