गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. क्रिकेट मराठी
  4. »
  5. क्रिकेट वृत्त
Written By वेबदुनिया|

श्रीलंका व विश्वकरंडकादरम्यान गेल

FILE
जोरदार लयीत असलेली श्रीलंकन संघास पहिल्यांदा टी-२० विश्वकरंडकाच्या स्वप्नपूर्तीसाठी वेस्ट इंडिजविरूद्धच्या फायनल लढतीत धडाकेबाज फलंदाज ख्रिस गेलला झटपट बाद करावे लागेल.

सेमीफायनलमध्ये गेलच्या तूफानात ऑस्ट्रेलियन संघ नेस्तानाभूत झाला होता. याची चिंता श्रीलंकन कर्णधार जयवर्धनेसही असणारच.

श्रीलंकन संघाने सुपर आठ मध्ये एकही सामना गमावला नाही. सेमीफायनलमध्ये त्यांनी पाकिस्तानवर १६ धावांनी विजय संपादन केला होता.

मात्र श्रीलंकेच्या करंडकाच्या वाटेत गेलचे तूफान आहे. श्रीलंकेस गेलला फेल करून हे तूफान थोपवावे लागेल. गेलने ऑस्ट्रेलियाविरूद्ध ४१ चेंडूत ६ षट्कार व ५ चौकाण तडकावून ७५ धावा केल्या होत्या.

गेलच्या खेळीने वेस्ट इंडिज १९८३ नंतर पहिल्यांदाच विश्वकरंडकाच्या फायनलमध्ये पोहचला आहे.