शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. क्रिकेट मराठी
  4. »
  5. क्रिकेट वृत्त
Written By वेबदुनिया|

संगकाराकडे टेस्ट क्रमवारीत 'नंबर वन'ची संधी

PTI
PTI
श्रीलंकेचा डावखूरा फलंदाज कुमार संगकाराने बुधवारी जारी आयसीसी टेस्ट क्रमवारीनुसार दुसर्‍या दुसर्‍या क्रमांकावर झेप घेतली असून पहिल्या क्रमांकावर आसनस्थ होण्याची त्याला सुवर्णसंधी आहे.

पाकिस्तानविरूद्ध गॅले कसोटीत नाबाद १९९ धावांच्या खेळीनंतर त्याच्या क्रमवारीत सुधारणा झाली आहे. गॅले कसोटीअगोदर तो ७७९ अंकांसोबत पाचव्या क्रमांकावर होता. १९९ धावांच्या नाबाद खेळीने ७१ अंकांची झेप घेत ८५० अंकांसोबत तो थेट दुसर्‍या क्रमांकावर पोहचला. श्रीलंकेने पाकविरूद्धची पहिली कसोटी २०९ धावांच्या मोठ्या अंतराने जिंकली.

संगकारा आणि शीर्षस्थानी असलेल्या शिवनारायण चंद्रपाल यांच्या आता फक्त सहा अंकांचे अंतर आहे. संगकाराकडे दुसर्‍या कसोटीत क्रमवारीत पहिल्या स्थानावर झेपावण्याची सुवर्णसंधी आहे.