मंगळवार, 16 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. क्रिकेट मराठी
  4. »
  5. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified: मुंबई , गुरूवार, 27 मार्च 2014 (17:20 IST)

सचिन तेंडुलकर करणार आयपीएलचे प्रमोशन

क्रिकेटमधून निवृत्त झालेला मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आयपीएलमध्ये दिसणार आहे. दचकलात ना. सचिन मैदानावर खेळणार नाही तर इंडियन प्रिमीअर लीगच्या सातव्या सीझनमध्ये प्रमोशन करताना दिसणार आहे. 'आयपीएल'च्या सहाव्या मोसमात मुंबई इंडियन्सतर्फे खेळणारा सचिन आतापर्यंत आपल्याच संघाला प्रमोट करत  होता. पण आता तो आयपीएलला प्रमोट करणार आहे.
 
'बीसीसीआय'च्या या लीगच्या नव्या प्रोमोमध्ये सचिन मुंबईच्या वानखेडे स्टेडियममध्ये 'सचिन तेंडुलकर स्टँड'मध्ये  बसलेला दिसत आहे. आयपीएलच्या 78 सामन्यात एक शतक आणि 13 अर्धशतकांसह सचिने 2334 धावा केल्या आहेत.