बुधवार, 24 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. क्रिकेट मराठी
  4. »
  5. क्रिकेट वृत्त
Written By वेबदुनिया|
Last Modified: मुंबई , गुरूवार, 29 मार्च 2012 (11:44 IST)

सचिन लंडनमध्ये पण आयपीएलमध्ये खेळणार!

WD
पायाच्या अंगठय़ाला झालेल्या दुखापतीबाबत सल्ला घेण्यासाठी सचिन तेंडुलकर लंडनला गेला आणि काल दिवसभर चर्चा रंगली ती सचिन आयपीएलच्या यंदाच्या सत्राला मुकणार असल्याची. पण अखेर सायंकाळी मुंबई इंडियन्सने हे निवेदन जारी करून सचिन खेळणार असल्याचा खुलासा केला आणि चाहत्यांनी सुटकेचा नि: श्‍वास टाकला.

‘सचिन आयपीएलचे हे सत्र खेळणार यात कोणतीही शंका नाही. तो फक्त सल्ला घेण्यासाठी लंडनला गेला आहे. ३१ मार्च रोजी मुंबई इंडियन्सच्या वानखेडे स्टेडियमवर होत असलेल्या एक दिवसीय शिबिरातही तो सहभागी होईल; इतकेच नव्हे तर ३ एप्रिल रोजी चेन्नईत होत असलेल्या उद्घाटन समारंभासही उपस्थित राहणार असल्याचा खुलासा मुंबई इंडियन्सने आपल्या निवेदनात केला आहे.