मंगळवार, 23 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. क्रिकेट मराठी
  4. »
  5. क्रिकेट वृत्त
Written By वेबदुनिया|

सचिनकडे बॅट आहे, सुदर्शन चक्र नाही!

WD
राहुल द्रविड आणि सुनील गावस्कर या माजी भारतीय कर्णधारांनी सतत अपयशी ठरत असलेला मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा बचाव केल्यानंतर माजी कसोटीपटू नवज्योत सिद्धही सचिनच्या समर्थनासाठी सरसावले असून, सचिनकडे बॅट आहे, सुदर्शन चक्र नाही, की जे फिरविले की यश मिळते. अशी गुगली टाकून त्यांनी सचिनच्या टीकाकारांची तोंडे बंद केली आहेत. सिद्धु म्हणाले, की भारतीय क्रिकेयमध्ये सचिनची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे.

द्रविड, लक्ष्मण आणि गांगुलीसारखे मध्यला फळीतील निष्णात फलंदाज संघात नसताना नवे पर्यायही मिळत नाहीत. त्यामुळे सचिनसारख्‍या अनुभवी फलंदाजाची संघाला फार गरज आहे. योग्य पर्याय मिळेपर्यंत तरी, सचिनच्या निवृत्तीविषयी चर्चा करणे योग्य नाही, असे मत सिद्धु यांनी एका मुलाखतीत व्यक्त केले.