गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. क्रिकेट मराठी
  4. »
  5. क्रिकेट वृत्त
Written By वेबदुनिया|
Last Modified: शनिवार, 2 एप्रिल 2011 (12:21 IST)

सचिनच्या महाशतकाची प्रतीक्षा!

आजच्या सामन्यात मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या महाशतकाकडे सर्वांचे लक्ष असणार आहे. सचिन आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शतकांचे शतक पूर्ण करण्याच्या उंबरठ्यावर आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावांचा विक्रम नावावर असलेल्या सचिन तेंडुलकरने, यावर्षीच्या विश्वचषक स्पर्धेत आतापर्यंत दोन शतके आणि दोन अर्धशतकांसह ४६४ धावा काढल्या आहेत. भारताला अनेकदा एकहाती विजय मिळवून दिलेला सचिन घरच्या मैदानावर विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात शतक ठोकून संघाला विश्वचषक जिंकून देत दुग्धशर्करा योग साधेल, अशी अपेक्षा तमाम क्रिकेटप्रेमी करीत आहेत.