गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. क्रिकेट मराठी
  4. »
  5. क्रिकेट वृत्त
Written By वेबदुनिया|

सचिनपेक्षा लारा उत्तम फलंदाज - पाँटिंग

WD
एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत रिकी पाँटिंगने असे वक्तव्य केले आहे की, सचिन तेंडुलकर आणि ब्रायन लारा हे दोघेही महान फलंदाज असले तरी लारा हा मॅचविनर फलंदाज आहे. सचिनच्या तुलनेत लाराने संघाला जास्त सामने जिंकून दिल्याने लारा सचिनपेक्षा सरस असल्याचे तो सांगतो.

सचिन आणि लारा या दोघांच्या बाबतीत पॉटिंग म्हणतो, कर्णधारपदाच्या काळात दुस-या दिवशी लारा बॅटिंगला येणार आहे या धास्तीनेच माझी झोप उडत असे. सचिनच्या बाबतीत मात्र मला एवढी चिंता वाटत नसे.' सचिन फलंदाजी करत असेल तेव्हा त्याला रोखण्यासाठी तुम्ही काही डावपेच लढवू शकता, पण लाराच्या बाबतीत तसं नाही. तो अर्ध्या तासात मॅचचा निकाल फिरवू शकतो. तुम्ही किती शतकं झळकावता यापेक्षा तुम्ही तुमच्या खेळीने संघाला किती वेळा विजय मिळवून देऊ शकता, हे माझ्यासाठी जास्त महत्वाचं आहे, असेही त्याने सांगितले.