बुधवार, 24 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. क्रिकेट मराठी
  4. »
  5. क्रिकेट वृत्त
Written By वेबदुनिया|

सुपर कामगिरीसाठी चेन्नई सज्ज

WD
गतमोसमापर्यंत गृहमैदानावर ‘किंग्ज’ ठरलेल्या चेन्नई सुपरकिंग्जला यंदाच्या एम.ए. चिदंबरम स्टेडियममध्ये लौकिकाला साजेशी कामगिरी करता आलेली नाही. शुक्रवारी डेक्कन चार्जर्सविरुद्ध चेपॉक मैदानावर खेळल्या जाणार्‍या लढतीच्या निमित्ताने यजमान संघाला पराभवाची मालिका खंडित करण्याची संधी आहे.

गोलंदाजी व फलंदाजीची बाजू मजबूत असली तरी गेल्या दोन्ही सामन्यांत आमच्या खेळाडूंना लौकिकाला साजेशी कामगिरी करता आली नाही, अशी कबुली चेन्नई सुपरकिंग्जचे प्रशिक्षक स्टिफन फ्लेमिंग व कर्णधार महेंद्रसिंग धोनी यांनी दिली. आता खेळाडूंपुढे चमकदार कामगिरी करण्याशिवाय पर्याय शिल्लक नसल्याचे प्लेमिंग यांनी म्हटले आहे.

चार्जर्स संघाची फलंदाजीची भिस्त कॅमरुन व्हाईट, शिखर धवन व कर्णधार कुमार संगकारा यांच्या कामगिरीवर अवलंबून आहे. पार्थिव पटेल व जीन पॉल ड्युमिनी यांच्याकडूनही चार्जर्स संघाला चमकदार कामगिरीची आशा आहे. गोलंदाजीमध्ये डेल स्टेनचा अपवाद वगळता चार्जर्स संघाच्या अन्य गोलंदाजांची कामगिरी निराशाजनक ठरली आहे.