शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. क्रिकेट मराठी
  4. »
  5. क्रिकेट वृत्त
Written By वेबदुनिया|

स्पॉट फिक्सिंग : पाच खेळाडूंची विकेट

WD
आयपीएलमध्ये स्पॉट फिक्सिंग होत असल्याची धक्कादायक माहिती एका वृत्तवाहिनीने स्टिंग ऑपरेशनमधून पुढे आणल्यानंतर खडबडून जागे झालेल्या बीसीसीआयने आज पाच खेळाडूंना १५ दिवसांसाठी निलंबित केले.

शलभ श्रीवास्तव (किंग्ज इलेव्हन पंजाब), टी. सुधेंद्र (डेक्कन चार्र्जस), मोहनिश मिश्रा (पुणे वॉरियर्स), अमित यादव (किंग्ज इलेव्हन पंजाब) आणि अनुभव बाली हे ते पाच जण आहेत. आयसीसीच्या भ्रष्टाचारविरोधी समितीचे माजी अध्यक्ष रवी सावनी यांची चौकशी आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. १५ दिवसांत ते अहवाल सादर करतील.
इंडिया टीव्हीने केलेल्या स्टिंग ऑपरेशनमध्ये रिपोर्टरने या खेळाडूंशी संघाचा प्रतिनिधी म्हणून चर्चा केली. खेळाडूंच्या मागण्या सर्वसामान्य प्रेक्षकांची विकेट घेणार्‍या आहेत. सोमवारी रात्री हे स्टिंग ऑपरेशन समोर आल्यानंतरच बीसीसीआयने कडक कारवाई करण्याचे संकेत दिले होते. त्यासाठी आज आयपीएलच्या संचलन परिषदेची बैठक झाली व तसा निर्णय घेण्यात आल्याचे आयपीएलप्रमुख राजीव शुक्ला यांनी सांगितले.

दरवर्षी क्रीडा संघटनांना ३0-३0 कोटी रुपये दिले जातात. परंतु, हा पैसा कुठे जातो त्याचा कुठे हिशेब नसतो. या सर्वांचे अंतर्गत ऑडिटिंग करणे आवश्यक आहे.