मंगळवार, 23 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified: मंगळवार, 29 सप्टेंबर 2015 (09:36 IST)

स्वच्छ भारत अभियानाचं अँथम सचिनच्या आवाजात

मुंबई- क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर आपल्याला आता गाताना दिसणार आहे. सचिननं नुकतंच स्वच्छ भारत अभियानचं अँथम रेकॉर्ड केलं. सचिनने ट्विटरवरून ही माहिती दिलीय. स्वच्छ भारत अभियानासाठी आपली आणखी एक मदत असल्याचे त्याने सांगितले. प्रसिद्ध संगीतकार शंकर-एहसान-लॉय यांनी संगीतबद्ध केलेलं हे अँथम आहे. 2 ऑक्टोबरला हे अँथम रिलीज होणार आहे. शंकर महादेवन यांच्यासोबत सचिनंही हे गायलंय.