गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified: सोमवार, 7 डिसेंबर 2015 (10:05 IST)

हरभजनसिंगकडून 'बुक माय स्पोर्ट्स' लॉन्च

भारतात प्रथमच खास क्रीडा क्षेत्रासाठी ‘बुक माय स्पोर्ट्स‘ ही नवी वेबसाईट बनविण्यात आली असून, भारताचा फिरकीपटू हरभजनसिंगच्या हस्ते या वेबसाईटचे अनावरण करण्यात आले आहे.
 
भारतातील क्रीडा क्षेत्रात घडत असलेल्या घडामोडींबद्दल सामान्य नागरिक अनभिज्ञ असतात. नागरिकांचे क्रीडा क्षेत्राशी नाते जोडण्याच्या उद्देशाने ‘बुक माय स्पोर्ट्स‘ ही वेबसाईट सुरु करण्यात आली आहे. क्रीडा क्षेत्रातील संधी, विविध स्पर्धा, माहिती असे सर्वकाही या वेबसाईटवर उपलब्ध असणार आहे. या वेबसाईटवर फुटबॉल, जलतरण, व्हॉलीबॉल, क्रिकेट, टेनिस, बास्केटबॉल या प्रमुख खेळांना महत्त्व देण्यात आले आहे.