बुधवार, 24 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. क्रिकेट मराठी
  4. »
  5. क्रिकेट वृत्त
Written By वेबदुनिया|

‘मि. वॉल’चा आज गुडबाय.!

WD
द्रविड युगाची आज समाप्ती; ऑस्ट्रेलियन दौर्‍यातील गचाळ कामगिरीनंतर संन्यास घेणारा द्रविड आज पहिला सिनीअर ठरेल. वन-डेतून त्याने आधीच नवृत्ती घेतली होती, आता कसोटीलाही राम-राम ठोकणार आहे.

राहुल द्रविड.. सचिन तेंडुलकरनंतर आकडेवारीत सर्वांत यशस्वी फलंदाज.. पण सचिनसारखे ग्लॅमर त्याच्या वाट्याला कधीच आले नाही. मैदानावरील कामगिरीची तुलना केली तरी सचिनच्या तोडीचा फलंदाज भारताने जगाला द्रविडच्या रूपाने दिला. आघाडीचे फलंदाज पटापटा पडल्यावर अनेक वेळा द्रविडने टीम इंडियाला मोठी खेळी करून तारले आहे. ‘मि. वॉल’ किंवा ‘मि. डिपेंडेबल’ अशी द्रविडची ख्याती आहे. मितभाषी आणि शांत स्वभावाच्या द्रविडचे हे गुण फलंदाजीत देखील उतरले आहेत. शतक ठोकल्यानंतरही द्रविड अत्यंत संयमाने आनंद व्यक्त करायचा. द्रविड युगाची आज समाप्ती होईल. त्यानिमित्त त्याच्या कारकिर्दीचा हा धावता आलेख.

१९९६ साली लॉर्ड्सवर इंग्लंडविरुद्ध कसोटी कारकिर्दीला प्रारंभ करणार्‍या द्रविडने पहिल्याच कसोटीत ९५ धावांची खेळी केली होती. येथेच द्रविडच्या जगातील एका सर्वोत्तम फलंदाजाची बिजे रोवली गेली. आकडेवारी द्रविडला सर्वोत्तम बनवितेच; पण, त्याशिवाय कोणत्याही क्रमांकावर फलंदाजी करण्याची क्षमतादेखील त्याच्यात होती. इतकेच नव्हे, तर फिटनेसबाबतही द्रविडचा हात कोणी धरू शकत नाही.