शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. आज-काल
  3. मंथन
Written By

उन्हातही गाडी थंड ठेवणे होईल शक्य

उन्हाळ्याच्या दिवसांत आग ओकणार्‍या सूर्यामुळे घरे व गाड्या तापणे सामान्य गोष्ट आहे. त्यामुळे त्यात बसलेल्या लोकांना प्रचंड उकडते. मात्र अमेरिकी शास्त्रज्ञांनी या समस्येवरचा उपाय शोधून काढला आहे. त्यांनी असा एक पातळ, लवचिक व हलका पदार्थ विकसित केला आहे, जो सगळ्या दिशांहून येणारा सूर्यप्रकाश शोषून घरे व गाड्यांना थंड ठेवण्यात सक्षम असेल.
 
अमेरिकेतील युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्नियातील इंजिनियर्सच्या चमूने नियर परफेक्ट ब्रॉडबँड अँब्जॉर्बर नावाचा हा पदार्थ तयार केला असून तो अतिनील प्रकाशाचा 78 टक्कयांपेक्षा जास्त हिस्सा शोषून घेतो. त्याची सर्वात मोठी खासियत म्हणजे तो प्रत्येक दिशेहून प्रकाश शोषून घेतो. हा पदार्थ हलका व लवचिक असल्याने त्याचा वापर अतिशय सहज असतो.
 
नॅनो कणांच्या मदतीने बनविलेला हा खास पदार्थ विकसित करण्यार्‍या चमूचे नेतृत्व करणारे प्राधप्यापक झाओवी लिऊ आणि डोनाल्ड सरबुली यांनी सांगितले की हा पदार्थ विकसित करण्यासाठी ज्या सिद्धांताचा वापर केला आहे त्याची एखाद्या धातूवर चारणी घेणे शक्य नाही. त्यामुळे शास्त्रज्ञांनी सेमीकंडक्टर झिंक ऑक्साइच्या मदतीने तो बनविला आहे.
 
धातू नसला तरी त्याचे गुणधर्म बर्‍याअंशी धातूशी मिळतेजुळते आहेत. प्रकाशाला पूर्णत शोषून घेणारे पदार्थ आधीही बनविलेले आहेत, पण ते सगळे वजनदार आहेत. दुमडल्यानंतर ते तुटण्याचही धोका असतो. हा नवा पदार्थ मात्र लवचिक आहे. त्याच्याद्वारे ह्वया त्या लहरींचा प्रकाश शोषला जाऊ शकतो.