जागतिक ग्राहक दिन.....

Last Modified रविवार, 15 मार्च 2020 (07:00 IST)
ग्राहक म्हणजे बाजारपेठेचा राजा. आजच्या जागतिकीकरणाच्या स्पर्धात्मक युगात ग्राहक राजा महत्त्वाचा घटक झाला आहे. ग्राहक हा बाजारपेठेतील आर्थिक उलाढाल आणि खरेदी-विक्रीचा केंद्रबिंदू आहे. पण ह्या ग्राहकाची फसवणूक केली जाते. एक वस्तू खरेदी करा आणि दुसरी वस्तू मोफत मिळवा. अमुक खरेदीवर सोने चांदीचे नाणे मिळवा. चेहरा ओळखा आणि लाखांची बक्षीशे मिळवा. भाग्यवान विजेत्यांना कार मिळेल. अश्या प्रकाराची जाहिराती दाखवून ग्राहकांची फसवणूक केली जाते.

वस्तू खरेदी करताना कुठल्याही आमिषाला बळी न पडता वस्तूची पारख नीटनेटकी करून घ्यावी. वस्तूची ऑनलाईन खरेदी करताना सुद्धा ग्राहकांनी सावधगिरी बाळगायला हवी. फसवणूक झाल्यास ग्राहकांनी न्यायालय किंवा जिल्हा ग्राहक मंचाकडे तक्रार करावी. यासाठी रेरा कायदाही अमलात आला आहे. जागतिकीकरणाच्या स्पर्धात्मक युगात ग्राहकांसाठी हा दिन साजरा होणे गरजेचे आहे. ग्राहकांना सेवा पुरवताना होणाऱ्या हलगर्जीपणामुळे 1960 मध्ये अमेरिकेत अध्यक्षीय निवडणुकीमध्ये ग्राहकांच्या प्रश्नाचे निचरा करण्यासाठी एक व्यासपीठ तयार करण्यात आले आणि त्यासाठीचे जागतिक स्तरांवर पाठपुरावेही करण्यात आले. त्याला यूनेस्कोनेही मान्यता दिली. त्यानुसार दरवर्षी 15 मार्च हा दिवस म्हणून पाळला जातो. वस्तू खरेदी करताना काळजी घेण्यासारख्या काही गोष्टी आहे.

1 फसव्या जाहिरातींना बळी पडू नका.
2 वस्तू खरेदी करताना एम.आर.पी. पेक्षा जास्त किंमत देऊ नका.
3 वस्तू खरेदी करताना बिल मागावे.
4 सोने खरेदी करताना हॉलमार्ककडे लक्ष द्या.
5 डबाबंद खाद्य पदार्थांची व्यवस्थित पाहणी करा.
6 वस्तू खरेदी करताना एक्सपायरी डेट तपासून पहा.
7 पेट्रोल पंपावर पेट्रोल भरताना शून्य तपासा नंतरच पेट्रोल भरा.
8 ऑनलाईन खरेदी करताना सजग राहा.
9 वस्तू खरेदी करताना त्याची पूर्ण माहिती जाणून घ्या.

ग्राहकांना संरक्षणाचा, माहिती मिळवण्याचा, निवड करण्याचा अधिकार ग्राहकांना आहे. अनेकदा खरेदी करताना किंवा मिळणाऱ्या सर्व्हिसच्या बाबतीत त्याचा वापर करताना ग्राहक अनेक गोष्टींकडे दुर्लक्ष करतात. त्याचा फायदा विक्रेते करतात. ग्राहक या नात्याने आपणास अनेक अधिकार दिले आहे. या अधिकारांची माहिती घेऊन आपण जागरूक ग्राहक बनू शकता. सरकार कडूनही ग्राहकांच्या जनजागृतीसाठी वेळोवेळी जाहिराती जारी केल्या जातात. फसवणूक झाल्यावर तक्रार कुठे करावी. कोणाकडून फसवणूक झाल्यावर आपण संबंधित विक्रेतेला धडा कसे शिकवू शकता आणि नुकसानाची भरपाई कसे मिळवू शकता.

आज 15 मार्च जागतिक ग्राहक हक्क दिन आहे. या निमित्ताने
ग्राहक संरक्षण मंत्रालयाने jaagograhakjago. gov.in ही वेबसाइट सादर केली आहे. या वेबसाइटवर ग्राहकाशी संबंधित माहिती एकाच ठिकाणी मिळू शकते.

त्याशिवाय ग्राहकांचे अधिकार, तक्रार, सर्व माहिती मिळू शकेल. या वेबसाइटवर कुठल्याही कंपनीची तक्रार करणं सोपे आहे. ग्राहक टोल फ्री क्रमांक, मेसेज किंवा ऑनलाईन तक्रारही करू शकतात. त्याच बरोबर केलेल्या तक्रारीची स्थिती ग्राहक वेबसाइट द्वारे ट्रेक करू शकतात.

ग्राहक संरक्षण कायदा 1986 च्यानुसार ग्राहकांना वस्तू निवडणे, वस्तूची गुणवत्ता, प्रमाण आणि दर्जा जाणून घेण्याचा अधिकार आहे. ग्राहकांची फसवणूक रोखण्यासाठी जिल्हा ग्राहक मंच, ग्राहक न्यायालय आणि जिल्हा तक्रार निवारण ही प्रणाली राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर कार्य करत आहे.

ग्राहकांना सेवा पुरवताना होणाऱ्या हलगर्जीपणामुळे 1960 साली अमेरिकेत अध्यक्षीय निवडणुकीत ग्राहक चळवळीचा मुद्दा घेण्यात आला आणि त्यासाठी अमेरिकेचे अध्यक्ष जॉन .एफ.केनेडी यांनी ग्राहकांच्या प्रश्नाचे निवारण करण्यासाठीचे एक व्यासपीठ तयार केले.जागतिक स्तरांवर त्याचा पाठपुरावाही केला. त्याला यूनेस्कोकडून मान्यता मिळवली. त्या वर्षीपासून दरवर्षी 15 मार्च हे जागतिक ग्राहक दिन म्हणून साजरा आणि पाळला जातो.
यावर अधिक वाचा :

Corona virus ची भीती, काय प्रत्येकाला मास्क लावणे आवश्यक, ...

Corona virus ची भीती, काय प्रत्येकाला मास्क लावणे आवश्यक, आरोग्य मंत्रालयाने जारी केले निर्देश
भारतात कोरोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या वाढत असून केंद्र सरकारने यासाठी तयारी केलेली ...

महाराष्ट्रात कोरोनाचा पहिला बळी

महाराष्ट्रात कोरोनाचा पहिला बळी
देशभरात करोना व्हायरसमुळे काळजीचं वातरवारण पसरलं असताना महाराष्ट्रात या आजरामुळे पहिल्या ...

राज्यात कोरोना रुग्ण संख्या ३९, १०८ लोक विलगिकरण कक्षात

राज्यात कोरोना रुग्ण संख्या ३९, १०८ लोक विलगिकरण कक्षात
राज्यात यवतमाळ येथे १ आणि नवी मुंबई येथे १ असे २ कोरोना रुग्ण आढळून आले. यामुळे राज्यातील ...

कोरोना रोखण्यासाठी राज्य सरकारचे 11 मोठे निर्णय माहीत हवेत

कोरोना रोखण्यासाठी राज्य सरकारचे 11 मोठे निर्णय  माहीत हवेत
– राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तीन महिने पुढे ढकलल्या. – ग्रामीण ...

पुणे : दुकाने 3 दिवस बंद

पुणे : दुकाने 3 दिवस बंद
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुण्यातली दुकानं पुढील तीन दिवस बंद राहणार आहेत. कोरोनाचा फैलाव ...

आणखी दोन आठवडे लॉकडाउन हवा

आणखी दोन आठवडे लॉकडाउन हवा
तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी 14 एप्रिलनंतर आणखी दोन आठवड्यांचे लॉकडाउन ...

पुणे जिल्ह्यात 38 नवीन कोरोना बाधित रूग्ण

पुणे जिल्ह्यात 38 नवीन कोरोना बाधित रूग्ण
राजेश टोपे म्हणाले, “सध्या राज्यात 32 हजार 521 व्यक्ती घरगुती विलगीकरणात असून 3498 जण ...

मातोश्री परिसर सील

मातोश्री परिसर सील
मातोश्री हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान असून या परिसरात असलेल्या एका ...

नागपुरात करोनाचा पहिला बळी

नागपुरात करोनाचा पहिला बळी
एका ६५ वर्षीय नागरिकाचा करोनाची बाधा झाल्याने इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व ...

राज्यात ८६८ कोरोनाग्रस्त

राज्यात ८६८ कोरोनाग्रस्त
राज्यातील करोनाची लागण झालेल्यांची संख्या ८६८ वर पोहोचली आहे. राज्यात आज दिवसभरात १२० ...